महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असणार दिवंगत दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांना समर्पित

Khajuraho Film Festival 2023 : दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांना समर्पित नवव्या खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन 16 डिसेंबर रोजी होणार आहे. हा महोत्सव आठ दिवस चालणार आहे.

Khajuraho Film Festival 2023
खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 4:58 PM IST

मुंबई- Khajuraho Film Festival 2023 :श्रीदेवी यांना समर्पित नवव्या खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन 16 डिसेंबरला होणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या आठ दिवसांच्या महोत्सवामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. या कार्यक्रमामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दलची दखल घेतली जाणार आहे. श्रीदेवी यांनी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची अष्टपैलू कामगिरी ही सर्वांनाचं माहीत आहे. या महोत्सवाचं उद्दिष्ट भारतातील आणि परदेशातील चित्रपट प्रदर्शित करणे आणि क्युरेट सत्र घेणं आहे.

श्रीदेवी यांना समर्पित असणार चित्रपट महोत्सव : प्रयास प्रॉडक्शनचे संचालक राजा बुंदेला यांनी सांगितले की, ''श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पुढं त्यांनी म्हटलं, या कार्यक्रमात देश-विदेशातील चित्रपटही दाखवले जातील''. वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रीदेवी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला. श्रीदेवी यांचा अभिनय हा अनेकांना आवडतो. श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयानं भारतीय चित्रपटांना जगभरात ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.

खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असणार विशेष : खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'गदर 2' फेम मनीष बधवा, ​गुलशन ग्रोवर, असरानी, ​ हरीश भिमानी, अली खान, पंकज धीर यांसारखे दिग्गज कलाकारही हजेरी लावणार आहेत. या चित्रपट महोत्सवात केंद्रीय मंत्री कौशल किशोर आणि फग्गन सिंग कुलस्तेंसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी उपस्थित राहू शकते. दिग्दर्शक राम बुंदेला, जगमोहन जोशी, सुष्मिता मुखर्जी बुंदेला, राकेश साहू इत्यादी प्रयास प्रॉडक्शनशी संबंधित कलाकारांचाही महोत्सवाच्या आयोजनात विशेष सहकार्य आहे.

श्रीदेवीचा मृत्यू :श्रीदेवीचे निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी झाले. त्यांचा मृतदेह दुबईतील हॉटेलच्या खोलीतील बाथरुमध्ये टबमध्ये आढळला होता. निर्माता बोनी कपूर यांनी पत्नी, श्रीदेवी यांच्या दुःखद निधनाबद्दल खुलासा केला होता.

हेही वाचा :

  1. विद्युत जामवालनं हिमालयात साजरा केला वाढदिवस, जंगलामधील टारझनच्या लूकमधील फोटो केला शेअर
  2. 'दिल चाहता है' आयकॉनिक चित्रपटला 23 पूर्ण, फरहान अख्तरनं शेअर केला खास फोटो
  3. रिलेशनशिपमध्ये असताना मुनावर फारुकीनं काय केलं? अभिनेत्री आयेशा खाननं 'हा' केला गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details