महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Varun-Lavanya Photos : साऊथ स्टार वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी आज अडकणार लग्नबेडीत - हळदी समारंभाचे फोटो व्हायरल

Varun-Lavanya Photos : मेगास्टार चिरंजीवीचा भाचा आणि साऊथ स्टार वरुण तेज आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठीच्या हळदी समारंभाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हे कपल 1 नोव्हेंबरला इटलीतील टस्कनीमध्ये लग्नाबंधनात अडकणार आहेत.

Varun-Lavanya Photos
वरुण आणि लावण्य फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 10:42 AM IST

मुंबई - Varun-Lavanya Photos: मेगास्टार चिरंजीवीचा भाचा आणि साऊथ स्टार वरुण तेज आज लग्नबंधनात अडकणार आहे. वरुण हा अभिनेत्री लावण्‍या त्रिपाठीसोबत दीर्घकाळपासून रिलेशनशिपमध्ये होता. आता या जोडप्यानं त्यांच्या नात्याचे लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या जून महिन्यात या दोन्ही स्टार्सनं मोठ्या थाटामाटात साखरपूडा केला होता. हे स्टार कपल इटलीतील टस्कनीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नापूर्वी वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा हळदी समारंभ पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे खूप खूश दिसत आहे.

वरुण तेज-लावण्या त्रिपाठी हळदी समारंभाचे फोटो :हळदी समारंभाची थीम पिवळा रंग आहे. या समारंभाचा ड्रेस कोड पिवळा, गुलाबी आणि पांढरा होता. वरुण चमकदार पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. तर लावण्यानं पिवळ्या रंगाची चोली आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. फोटोमध्ये हे कपल एकमेकांच्या डोळ्यात मग्न झालेले दिसत आहेत, तर इतर फोटोंमध्ये त्यांचे नातेवाईक गार्डन परिसरात बसून कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहेत. याशिवाय आणखी दोन फोटोमध्ये साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी आणि त्याची पत्नी सुरेखा वधू-वरांना आशीर्वाद देत आहेत. वरुण आणि लावण्य लग्नात मनीष मल्होत्राचा डिझाईन केलेला पोशाख परिधान करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार लावण्याचा लग्नाचा पोशाख हा 'पेस्टल' कलरचा असणार आहे. हळदी समारंभानंतर पूल पार्टी झाली होती. पूल पार्टीनंतर, मेहंदी समारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचे फोटो देखील सध्या व्हायरल होत आहेत. याशिवाय हे जोडपे ५ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार असल्याचं बोललं जात आहे. दोघेही इटलीत १ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २.४८ वाजता लग्नबेडीत अडकणार आहेत. वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या लग्नाचे विवाहपूर्व विधी जोरदार सुरू आहेत. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित आहेत. हे एक भव्य डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे.

हेही वाचा :

  1. Sonnalli Seygall Pics : सोनाली सहगलनं शेअर केले इंस्टाग्रामवर हॉट फोटो ; पाहा पोस्ट....
  2. Kangana Ranaut : योगी आदित्यनाथ यांनी पाहिला कंगना राणौतचा 'तेजस' चित्रपट; पोस्ट केली शेअर
  3. Zimma 2 teaser released : ‘झिम्मा २’च्या गर्ल गँगमध्ये सामील होणार 'सैराट'ची आर्ची, ‘झिम्मा २’ चा टीझर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details