महाराष्ट्र

maharashtra

Soni Razdan birthday : 'तू आमचं सर्वस्व आहेस', म्हणत आलिया भट्टनं दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 5:31 PM IST

Soni Razdan birthday : आलिया भट्टनं आई सोनी राजदानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्तानं तिनं आपल्या आईचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केलाय. यात ती आईच्या मांडीवर बसून आहे याची सुंदर आठवणही शेअर केलीय.

Soni Razdan birthday
आलिया भट्ट आणि सोनी राजदान

मुंबई- Soni Razdan birthday :आलिया भट्टची आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनी राजदान आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं आलियानं आपल्या आईचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केलाय. फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलंय, 'तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या एका वाढदिवसाकडे मागे वळून पाहतेय.. मी संपूर्ण पार्टीचा वेळ तुझ्या मांडीवर बसून घालवला होता कारण मला गॉडझिलाची खूप भीती वाटत होती. पण तरीही मी पूर्णपणे समाधानी आणि आनंदी दिसतेय आणि स्पष्टपणे असं वाटते की माझ्यासाठी असे स्थान आता नाही.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. आमच्यासाठी तू सर्वस्व आहेस.... प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक दिवस तुझ्यासाठी कृतज्ञ आहे.'

आलियानं शेअर केलेल्या फोटोत आलिया आईच्या मांडीवर बसलेली दिसतेय. दुसऱ्या एका फोटोत आई-मुलीची छान जोडी एकत्र हसताना दिसतेय. या फोटोवर प्रतिक्रिया देताना आलियाची आई सोनी राझदाननं कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, की बाळातू माझ्या आयुष्यातला प्रिय प्रकाश आहेस, माझे मनापासून धन्यवाद. माझी मांडी नेहमीसाठीच तुझी आहे आणि माझे प्रेमही.

सोनी राजदान आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांचा विवाह 20 एप्रिल 1986 रोजी झाला होता. या जोडप्याला शाहीन आणि आलिया या दोन मुली आहेत. शाहीननंही तिच्या इंस्टाग्रामवर आईला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शाहीननं सोशल मीडियावर फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आणि लिहिले, 'माझ्या विश्वाचं आज, उद्या, नंतर आणि नेहमीसाठी केंद्र असलेल्या माँ ला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

लेक शाहीननं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर सोनी राजदाननं धन्यवाद दिले आहेत. तुझ्यामुळे माझं जग खूप आनंदी झाल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना लिहिलंय. सोनी राजदानने सारांश, गुमराह आणि मंडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 2018 मध्ये पुरस्कार प्राप्त 'राझी'मध्ये तिची मुलगी आलियासोबत स्क्रीन स्पेसही शेअर केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details