मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही फार दिवसांपासून रूपेरी पडद्यावर दिसली नाही. सोनमने अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा ती कामावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी, तिने शेअर केले की ती, लवकरच रूपेरी पडद्यावर परत येणार आहे. तिने शेअर करताना लिहले, विजेंद्र भारद्वाज आणि प्रबुद्ध यांच्यासोबतच्या मी 23 वर्षांची असताना शुटिंग केली, मला त्याच्याबरोबर काम करायला फार आवडले. मला कॅमेऱ्यासमोर येण्याची आठवण येते आणि या हिवाळ्यात परत येण्याची मी वाट पाहू शकत नाही! माझे तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. एक्स एक्स असे तिने पोस्टमध्ये लिहले आहे. म्हणजे लवकरच सोनम ही आपल्याला रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.
सोनमच्या पोस्टवर प्रतिक्रया :या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तिचे पती आनंद आहुजाने कमेंट करत इमोजीसह लिहले, 'अजूनही तसंच दिसतंय!! नेहमी क्लासिक' तसेच त्यानंतर सोनमचे वडील आणि अभिनेता अनिल कपूर यांनी लिहिले, 'प्रभूदासच्या कामाचे प्रचंड चाहते.. आजही फ्रेश आणि कलात्मक दिसतात.. क्लासिक फोटो' तसेच सोनमच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट केले आहे. काही तिच्या चाहत्याने तिला सुंदर म्हटले आहे. सोनमने अलीकडेच किंग चार्ल्स तिसरा (III) च्या राज्याभिषेक कार्यक्रमला उपस्थित राहून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. याबद्दल सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती.