हैद्राबाद : शोभिता धुलिपाला अलीकडे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दाक्षिणात्य सुप्पर स्टार नागा चैतन्यसोबत तिचे अफेयर असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. त्यावर अखेर अभिनेत्रीने उत्तर दिले आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी खूप भाग्यवान आहे की मला सुंदर चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मला नृत्य करायला फार आवडते आणि मी एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. मणिरत्नमच्या पोन्नियन सेल्वन या चित्रपटात मला ए.आर रहमान गाण्यांवर परफॉर्म करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे.' सध्या ती स्वतःच्या करियरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यानंतर तिने म्हटले, 'जे लोक नकळत लोक काहीही बोलत आहेत, त्यांना स्पष्टीकरण देणे हे मला गरजेचं वाटत नाही'.
शोभिता धुलिपा केला खुलासा :जर मी काही चुकीचे काम करत नाही तर, मला कुठल्याही गोष्टींचे स्पष्टीकरण द्यावं देणे मला गरजेचे वाटत नाही. ‘ यावेळी तिने नागा चैतन्य याच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील मौन सोडलं आहे. तिने म्हटले की, 'आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शांत राहून एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे'. शोभिताच्या चित्रपटाबद्दल बोलायचं गेलं तर, शोभिताला ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत पडद्यावर दिसल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच शोभिता मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी,विक्रम, त्रिशा, जयराम यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका या चित्रपटात साकारल्या आहे. आता शोभिता लवकरच आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूरसोबत ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात झळकणार आहे.