महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सिंघम अगेन'च्या सेटवरील करीना, अर्जुन, टायगर आणि रोहित शेट्टीचे फोटो व्हायरल - फोटो व्हायरल

Singham Again Shoot Pics Viral: दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'सिंघम अगेन'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच शूटिंग सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Singham Again Shoot Pics Viral
सिंघम अगेनमधील शूटचे फोटो व्हायरल

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 5:27 PM IST

मुंबई - Singham Again Shoot Pics Viral : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' स्टारकास्टमुळं चर्चेत आहे. या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण , रणवीर सिंग, करीना कपूरसह अनेक स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान चित्रपटाच्या सेटवरून फोटो लीक झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये करीना कपूर, रोहित शेट्टी, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेबो या चित्रपटात अजय देवगणच्या लेडी लव्हच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटाच्या सेटवरून अर्जुन कपूरचा लूकही लीक झाला आहे.

'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा फोटो व्हायरल : व्हायरल फोटोमध्ये अर्जुननं काळ्या रंगाचा शर्ट घातलेला. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्यानं वजन वाढवले आहे असं म्हटलं जात होतं, मात्र निर्मात्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. आता या चित्रपटात अर्जुन कॅमिओ करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच रोहितनं या अफवेला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा टायगरचा लूक सोशल मीडियावर लीक झाला होता. लिक झालेल्या सीनमध्ये सिंघम नसताना अर्जुन कपूर करीनाला मारायला येतो, पण टायगर श्रॉफ येतो आणि तिला वाचवतो. याशिवाय आणखी 'सिंघम अगेन'मधील एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दीपिका, अक्षय कुमार, करीना कपूर, हृतिक रोशन, अनिल कपूर, करण ग्रोव्हर यांच्यासह अनेक कलाकार सिंघमची सिग्नेचर स्टाइल करताना दिसत होते. हे नक्कीच 'सिंघम अगेन'चं टायटल सॉन्ग असणार असा अंदाजा लावण्यात आला.

'सिंघम अगेन'ची कास्ट आणि रिलीज डेट : 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग अर्जुन कपूर, यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहे. निर्मात्यांनी अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ यांचं फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात दीपिका आणि टायगर पोलिसांच्या गणवेशात अ‍ॅक्शन सीन करताना दिसेल. काही रिपोर्ट्सवर विकी कौशलही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र, निर्मात्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीचा हा चित्रपट साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-2'शी टक्कर देणार आहे.

हेही वाचा :

  1. बिग बॉस 17 चा मुनावर फारुकी बनला घराचा पहिला कॅप्टन
  2. राज कपूर यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त धर्मेंद्र यांनी शेअर केला थ्रोबॅक फोटो
  3. जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकर स्टारर 'ड्राय डे'चा ट्रेलर रिलीज; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details