महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sidharth Malhotra And Kiara Advani : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच सिद्धार्थ आणि कियारा दिसले एकत्र, पहा त्यांचा लूक - कियारा आणि सिद्धार्थ गेले डेनर डेटला

सिद्धार्थ आणि कियारा शनिवारी संध्याकाळी मुंबईतील रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले. दोघांनी त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून डेनर डेटसाठी वेळ काढला असून दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते.

Sidharth Malhotra And  Kiara Advan
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 2:20 PM IST

मुंबई : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बी-टाऊनचे पावरफुल कपल आहेत. आता नुकतेच दोघेही कामातून ब्रेक घेऊन वीकेंड एन्जॉय करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर या दोघांना पापाराझीने मुंबईतील रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट केले. कियारा-सिद्धार्थ दोघे एकत्र खूप सुंदर दिसत होते. दरम्यान आता सिद्धार्थ आणि कियाराचा एक व्हिडिओ समोर आलाय. हे दोघेही कारमधून उतरून थेट रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे क्लिपमध्ये दिसतय. यावेळी कियाराने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या लूकवर तिने खूप कमी मेकअप केले होते. याशिवाय लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिने केस मोकळे सोडले होते. यादरम्यान डेनिम जीन्स आणि स्नीकर्ससह ब्लूट टी-शर्टमध्ये सिद्धार्थ हा खूप देखणा दिसत होता.

चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव : सिद्धार्थ आणि कियाराला बऱ्याच दिवसांनी बाहेर एकत्र बघितल्यानंतर त्याच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे. चाहते या दोघांना 'क्यूट कपल' म्हणत आहेत. याशिवाय काहीजण हे एकमेकांसाठी बनवलेले आहेत' असे म्हटले आहे. सिद्धार्थ आणि कियारा काहीजण परफेक्ट कपल असल्याचे देखील म्हणत आहे. सिद्धार्थ आणि कियारा स्टारर चित्रपट 'शेरशाह' 24 ऑगस्ट 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला.

आगामी चित्रपट :सिद्धार्थ आणि कियाराने तीन वर्षे आपलं नाते गुप्त ठेवले होते. या जोडप्याने 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न केले. 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले होते. 'सत्यप्रेम की कथा'च्या यशानंतर कियारा अडवाणी लवकरच 'गेम चेंजर' या चित्रपटात राम चरणसोबत दिसणार आहे. याशिवाय ती हृतिक रोशनसोबत 'वॉर 2' या चित्रपटातही दिसणार असल्याचे बोललं जात आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा हा 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 15 डिसेंबर 2023 रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो दिशा पटानी आणि राशी खन्नासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details