जयपूर :बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. रविवारी सिद्धार्थच्या नावाची मेहंदी कियाराच्या हातावर लावण्यात आली. त्याच वेळी, लव्ह बर्ड्सचा हळदी समारंभ 6 फेब्रुवारीला सकाळी होणे अपेक्षित आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न ६ फेब्रुवारीला होणार असल्याचे ऐकले आणि वाचले होते. पण आता तसे राहिले नाही. हे जोडपे 6 फेब्रुवारीला लग्न करणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया सिड कियाराच्या लग्नाची तारीख काय आहे...
7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार :सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. 6 फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये हे जोडपे लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी होती. पण आता सिड-कियाराचे लग्न 6 फेब्रुवारीला होणार नाही. बॉलीवूडचे हे कपल 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेस हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नानंतर त्याच दिवशी सिड-कियारा ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार आहे.
सिद्धार्थ-कियारा यांचा वेडिंग ड्रेस : सिद्धार्थ-कियाराने त्यांच्या लग्नाच्या आउटफिट्ससाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची निवड केली आहे. कियाराने लग्नासाठी हस्तिदंती आणि लाल रंगाचा लेहेंगा निवडला आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ लाल शफासोबत ऑफ-व्हाइट शेरवानीमध्ये दिसणार आहे. हे जोडपे शाही विवाह करणार आहे. चाहते त्यांच्या लग्नातील फोटोंची आतुरतेने वाट बघत आहे.