जयपूर - बॉलिवूड सेलेब्रिटी कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. रविवारी सिद्धार्थच्या नावाची मेहंदी कियाराच्या हातावर लावण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांचा हळदी समारंभ 6 फेब्रुवारीला पार पडणार आहे. आपण पूर्वी सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न ६ फेब्रुवारीला होणार असल्याचे ऐकले आणि वाचले होते. पण आता तसे नाही. तर जोडपे ७ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटी जैसलमेरमध्ये दाखल होत आहेत. आज करण जोहर, मीरा कपूर आणि शाहिद कपूर दाखल झाले आहेत.
जैसलमेर विमानतळाबाहेर पापाराझींची मोठी गर्दी- कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला वऱ्हाडी मंडळी पोहोचत आहेत. आज बॉलिवूड संगीतकार आणि गायक विशाल दादलानी दाखल झाला. त्यापाठोपाठ धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याची एन्ट्री झाली. त्याच्यासोबत बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीराही होते. त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझीही मोठ्या संख्येने इथे आल्याचे दिसते.
करण जोहर आणि शाहिद कपूर जैसलमेरमध्ये दाखल - करण आणि शाहिदला पाहून विमानतळाबाहेर त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची मोठी धांदल उडाली. करणने शांतपणे त्यांच्याकडे पाहात आपल्या गाडीमध्ये जाणे पसंत केले. त्यापाठोपाठ शाहिदही गेला. परंतु करणच्या गाडीत न बसता त्याने मीरासह दुसरी गाडी पकडली. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था इतकी तगडी आहे की पापाराझींना सेलेब्रिटींच्या मुव्हमेंट्सही कॅप्चर करणे मुश्कील झाले आहे.