मुंबई - भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल नुकताच एका पंजाबी चॅट शोमध्ये आला होता. यावेळी त्याने त्याची कथित गर्लफ्रेंड सारा अली खानच्या नात्याबद्दलचा खुलासा केला. शुभमन नुकताच सोनम बाजवाच्या चॅट शो 'दिल दियां गल्लन'मध्ये दिसला आणि त्यानंतर झालेल्या संभाषणात पंजाबी अभिनेता सोनमने क्रिकेटर शुभमनला प्रश्न केला की बॉलिवूडमधील सर्वात फिटेस्ट कलाकार कोण आहे? यावर त्याने ‘सारा’ असे उत्तर दिले.
त्याच्या खुलाशानंतर सोनमने शुभमनला विचारले की तो अभिनेत्री सारा अली खानला डेट करत आहे का, यावर त्याने उत्तर दिले, "कदाचित." यावर सोनमने त्याला म्हटले की "सारा का सारा सच बोलो (सगळं खरं सांग)" असे म्हणत सत्य बोलण्यास सांगितले. यावर शुभमनने उत्तर दिले, "सारा दा सारा सच बोल दिया (मी संपूर्ण खरं सांगितले आहे). कदाचित, कदाचित नाही."
या वर्षी ऑगस्टमध्ये सारा आणि शुबमनच्या डेटिंगबद्दलच्या अफवा पसरू लागल्या होत्या जेव्हा ते एकत्र डिनर करताना दिसले होते. एका टिक-टॉक युजरने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हायरल झाला. त्यांच्या नातेसंबंधाच्या स्थितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांचे लक्ष व्हायरल क्लिपने वेधून घेतले होते.