मुंबई- बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने भाऊ सिद्धांत कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रद्धा कपूरने तिच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम दिसत आहे. हा फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने एक क्यूट कॅप्शनही लिहिले आहे. श्रद्धा कपूरच्या या फोटोवर लाखो कमेंट्स आल्या आहेत. अलिकडेच सिद्धांत कपूरला नुकतेच बेंगळुरू येथील एका पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी जामीन मिळाला आहे.
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरने 6 जुलै रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला. या संदर्भात श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर भावासोबतचा एक फोटो शेअर केला आणि 'घर वापसी, भैया बर्थडे = हॅपीनेस, हॅप्पी बर्थडे ब्रदर' असे तिने कॅप्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले आहे.
श्रद्धा कपूरच्या या पोस्टला 7 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले असून सिद्धांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धांत एक अभिनेता आहे आणि त्याने बहीण श्रद्धा कपूरच्या हसीना पारकर या चित्रपटात दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली होती.