मुंबई :बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या खाण्याबद्दल फार चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ जेवण करतांना किंवा काही पेय घेतांना असतात. मात्र सध्याला श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती ज्यूस घेवून दिसत आहे. ज्यूसचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहले, 'आरोग्य आपल्या हातात आहे. शुभ सकाळ!!!' तसेच श्रद्धाने अलीकडेच, श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मोहक फोटो पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये ती गुलाबी टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे.
श्रद्धा कपूरने मोहक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला :याशिवाय या फोटोत तिची नवीन हेअरस्टाइल फार मोहक दिसत आहे. श्रद्धाचा हा नो-मेकअप सेल्फी घेतला आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमचे हृदय छोटे करू नका, केस करा.' श्रद्धा या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या फार कमेंट केल्या आहे. एका चाहत्याने कमेंट केली, 'फार गोड दिसत आहे', तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले 'तू माझे हृदय घेतले आहे माझी लेडी क्रश' तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली, ' हो गया प्यार हो गया' अशा अनेक कमेंट या पोस्टवर बघायला मिळत आहे. तसेच या फोटोला फार चाहत्यांनी लाईक देखील केले आहे. श्रद्धाने फॅनफोलोविंग फार जास्त प्रमाणात आहे. अनेकदा ती तिच्या चाहत्यासोबत इंस्टाग्राम लाईव्हवरून संवाद साधत असते. तसेच श्रद्धा खूपदा रियालिटी शोमध्ये झळकत असते.