महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shilpa Shetty fitness challenge : शिल्पा शेट्टीचं फिटनेस चॅलेंज मुलगा वियान राजनं स्वीकारलं, पाहा व्हिडिओ - व्ही रविचंद्रन आणि संजय दत्त

Shilpa Shetty fitness challenge : अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सोमवारी इन्स्टाग्रामवर आपल्यांसाठी फिटनेस चॅलेंज शेअर केले आहे. यामध्ये तिचा मुलगा वियान राज तिच्यासोबत व्हिडिओमध्ये सामील झालाय.

Shilpa Shetty fitness challenge
शिल्पा शेट्टीचं फिटनेस चॅलेंज

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 2:32 PM IST

मुंबई - Shilpa Shetty fitness challenge : अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीतत खूप उत्साही व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या व्यायामावर ती नेहमी शिस्तबद्धपणे लक्ष देत असते आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना उद्युक्तही करत असते. तिच्याकडे फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट शरीरयष्टी आहे आणि ती तिच्या फिटनेस सेशनची झलक तिच्या चाहत्यांना निरोगी जगण्यासाठी प्रवृत्त करत असते. सोमवारी तिनं एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती तिचा मुलगा वियान राजसोबत व्यायाम करताना दिसतेय. यामध्ये ती म्हणते की, आज माझ्यासोबत सुपुत्र सामील झाला आहे. ती त्याला योगासनातील एक प्रकार करुन दाखवते आणि तसाच मुलालाही करायला भाग पाडते. वरकरणी सहज वाटणारी ही कृती प्रत्यक्ष करताना मात्र शरीराचा बॅलन्स सांभळताना तारांबळ उडते. वियान चांगला प्रयत्न करतो. त्यावर चाहत्यांना शिल्पा सांगते की तुम्हीही प्रयत्न करा, आज नाही जमले तर उद्या प्रयत्न करा, जमत नाही तोपर्यंत करत राहा.

तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'आजचे शिल्पा शेट्टी कुंद्राचे फिटनेस चॅलेंज. लहान मुलांप्रेमाणे खेळण्यासाठी वियान-राज आज माझ्यासोबत सामील झालाय. हा व्यायाम एक मोबिलिटी ड्रिल आहे, ज्यामध्ये शरीराच्या स्नायूंच्या कोर आणि लवचिकतेचा उपयोग होतो. हे आज किंवा उद्या वापरून पहा… मला खात्री आहे की तुम्हाला ते जमेल! पण, हार मानू नका आणि मला टॅग करायला विसरू नका!', असं तिनं लिहिलंय.

कामाच्या आघाडीवर शिल्पा शेट्टी अलिकडेच सोनल जोशीच्या सुखी चित्रपटामध्ये कुशा कपिला, दिलनाज इराणी, अमित साध आणि चैतन्य चौधरी यांच्यासोबत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.टी आगामी एक्शन ड्रामा स्ट्रीमिंग सीरिज इंडियन पोलिस फोर्समध्ये झळकणार आहे. रोहित शेट्टी आणि सुशवंत प्रकाश दिग्दर्शित या मालिकेत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शिल्पा शेट्टी ही व्ही रविचंद्रन आणि संजय दत्त यांच्यासोबत 'केडी-द डेव्हिल' या चित्रपटामध्येही झळकणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details