मुंबई- पंजाबची कॅटरिना कैफ अशी ओळख असलेली अभिनेत्री शहनाज गिल प्रसिद्धी झोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही. कधी अभिनेत्री आपल्या नखरा स्टाईलमध्ये तर कधी स्टार्सच्या पार्टीत थिरकून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडेच, शहनाजबद्दल बातमी आली होती की ती कोरिओग्राफर राघव जुयालला डेट करत आहे. आता खुद्द शहनाज गिलने मीडियासमोर या बातमीचे सत्य सांगितले आहे.
बुधवारी कार्यक्रमादरम्यान, जेव्हा मीडियाने शहनाज गिलला राघवसोबत डेटवर जाण्याचा प्रश्न केला तेव्हा शहनाजने आपल्या स्टाईलमध्ये सांगितले की, जर कोणी एकत्र स्पॉट केले तर याचा अर्थ असा नाही की ती फिरायला किंवा डेटला गेलेत असा होत नाही. यानंतर, शहनाजने विचारले, 'मीडिया खोटं का बोलतो? मीडिया प्रत्येक वेळी खोटे बोलतो आणि काहीही बोलतो. आपण कोणाच्या पाठीशी उभे राहिलो किंवा कोणाच्या सोबत हँग आउट झालो तर नातं जोडतो का? नाही नाही... बस झालं, मीडिया फालतू बोलत असतो. आता मला राग येतोय'.
हे सांगितल्यानंतर शहनाजने मीडियाला तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करू नका असे आवाहन केले आणि तिच्या कोणत्याही प्रोजेक्टच्या मुलाखतीदरम्यान ती नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तरे देईल असे सांगितले.