मुंबई - shahid kapoor and shahrukh khan : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे नाव आज टॉपच्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. शाहिद एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच चांगला डान्सर देखील आहे. जेव्हा त्याने 2003 मध्ये 'इश्क विश्क' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्याच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान काही वर्षापूर्वी शाहिद आणि शाहरुख खानची तुलना करण्यात आली होती. यावर आता शाहिदनं नाराजी व्यक्त केली आहे. शाहिद कपूरनं नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, लोक त्याला बॉलिवूडचा पुढचा शाहरुख खान म्हणायचे, पुढे त्यानं म्हटलं, 'माझी अनेकदा शाहरुखशी तुलना केली जात होती. ही खूप वाईट गोष्ट आहे. तुम्ही यशस्वी व्यक्तीसारखे असाल तर तुम्हीही यशस्वी व्हाल हा मूर्खपणाचा युक्तिवाद आहे, असंही त्यानं यावेळी म्हटलं.
शाहिद कपूर केली नाराजी व्यक्त : शाहिद कपूर पुढं सांगितलं, तुम्ही कुठेही तुलना करू शकत नाही. तुम्ही त्यांच्यासारखे आहात यावर अवलंबून, तुमचे भविष्यातील यश आहे. मी माझ्या आयुष्यात हा ऐकलेला मूर्खपणाचा युक्तिवाद आहे. जेंव्हा तुम्ही स्वतःसाठी अशी गोष्ट ऐकता तेव्हा तुम्हाला खूप दडपण येते. कारण तुलनेची ती अपेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत केली जात आहे. 'जर तुमची तुलना दुसऱ्याशी केली जात असेल तर हे योग्य नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचे खरे गुण विसरता. कधी कधी वाटतं मी किती मूर्ख आहे. अशा प्रकारे कोणाशीही तुलना करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.