मुंबई - Shahid Kapoor-Kriti Sanon's upcoming movie: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या मोस्ट अवेटेड रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचे शीर्षक अखेर निश्चित झाले आहे. 10 जानेवारी रोजी, निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. शाहिद आणि क्रितीच्या या आगामी चित्रपटाचं शीर्षक 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' असणार आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन पहिल्यांदाचं एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' शीर्षक रिलीज झाल्यानंतर शाहिद आणि क्रितीचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
शाहिद आणि क्रितीनं शेअर केलं पोस्टर :शाहिद आणि क्रितीनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, ''या व्हॅलेंटाइन आठवड्यात एक अशक्य प्रेमकहाणी अनुभवा. 'तेरी बातों में उल्झा जिया' 9 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.'' या पोस्टरमध्ये या दोघांची केमिस्ट्री आग लावणारी आहे. शाहिदनं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे, तर क्रिती कट-पीस टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये क्रिती सेनॉन रोबोटची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे, शाहिद कपूर रोबोटिक स्पेशालिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी फेब्रुवारीमध्ये थिएटरमध्ये दाखल होत असून ही जोडी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आराधना साह यांनी केले असून हा चित्रपट मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे.