महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pak Actress Mahira Khan : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान लवकरच अडकणार लग्नबंधनात... - माहिरा खान आणि सलीम करीमचे लग्न

शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान लग्न करणार आहे. यापूर्वी देखील माहिरा रणबीर कपूरमुळे चर्चेत आली होती. आता सध्या ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

माहिरा खान
Mahira Khan

By

Published : Aug 17, 2023, 6:04 PM IST

मुंबई :बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान स्टारर 'रईस' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. माहिरा ही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. 'रईस' चित्रपटानंतर माहिरा खानचे नाव बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले गेले. माहिरा खानचा रणबीर कपूरसोबतच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. दरम्यान आता तिच्याबद्दल असे बोलले जात आहे की, ती लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. चला जाणून घेऊया माहिरा खान कोणाशी करणार आहे लग्न...

माहिरा खान आणि सलीम करीम : माहिरा खान पुन्हा एकदा लग्न करणार आहे. वयाच्या ३८ वर्षी माहिरा दीर्घकाळ असलेला प्रियकर सलीम करीमसोबत लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. माहिराचा यापूर्वी घटस्फोट झाला आहे. माहिराने २००७ मध्ये पाकिस्तानी अभिनेता आणि दिग्दर्शक अली अक्सारीशी लग्न केले होते. त्यानंतर हे दोघे २०१५ मध्ये वेगळे झाले. आता माहिराच्या आयुष्यात पुन्हा एकदा खरे प्रेम परत आले आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. माहिराच्या आयुष्यात सलीम करीम नावाच्या व्यक्तीची एन्ट्री झाली असून तो पाकिस्तानी स्टार्टअपचा सीईओ आहे. ही एक नेटवर्क कॅरियर बिल्डिंग कंपनी आहे. याशिवाय सलीम हा डीजे देखील आहे.

सप्टेंबरमध्ये होणार लग्न : माहिरा आणि सलीम बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. असे म्हटले जात आहे की हे जोडपे आता त्यांच्या नात्यावर प्रेमाचा शिक्का मारण्याच्या मार्गावर आहे. माहिरा आणि सलीम पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहेत. हा एक खासगी सोहळा असेल, ज्यामध्ये फक्त खास नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील. हे लग्न पाकिस्तानमधील पंजाबच्या हिल स्टेशनवर होणार आहे. मात्र माहिराने लग्नाच्या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे २०१९ मध्ये सलीम आणि माहिराच्या एंगेजमेंटच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र या फोटोंवरही माहिराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

हेही वाचा :

  1. Akshay kumar upcoming movies 2024 : अक्षय कुमारचे आगामी चित्रपट लवकरच येणार रूपेरी पडद्यावर...
  2. Urfi Javed receives death threats : उर्फी जावेदला मिळाली जीवे मारण्याची धमकी...
  3. Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभू 'खुशी'च्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान झाली भावूक...

ABOUT THE AUTHOR

...view details