महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

SRKs Jawan postponed : शाहरुख खानच्या जवानचे रिलीज ऑगस्टपर्यंत लांबणीवर - पठाण धमाकेदार हिट

पठाण धमाकेदार हिट झाल्यानंतर, शाहरुख खान दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत जवान चित्रपट बनवत आहे. मात्र या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनला विलंब होत असल्यामुळे २ जून रोजी रिलीज होणारा जवान ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे.

SRKs Jawan postponed
शाहरुख खानच्या जवानचे रिलीज ऑगस्टपर्यंत लांबणीवर

By

Published : May 5, 2023, 7:10 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते त्याचा आगामी 'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा करत आहेत. असे असताना चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवणारी बातमी येऊन थडकली आहे. येत्या २ जून रोजी रिलीज होणारा हा चित्रपट आता 25 ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडला आहे. यामुळे किंग खानचे फॅन्स नाराज झाले. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम अद्याप पूर्ण झाले नसून अद्याप अंतिम टच देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच निर्मात्यांनी जवानचे रिलीज पुढे ढकलले आहे.

अ‍ॅक्शन ड्रामा जवान - जवान हा एक अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये शाहरुख खान साऊथ सुपरस्टार नयनतारा, विजय सेतुपती आणि संजय दत्त यांच्यासह काम करत आहे. किंग खानच्या मागील हिट पठाण चित्रपटाच्या पावलावर पाऊल ठेवत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. पठाणने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींची कमाई केली होती. जवानच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने, चाहते आता चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. विलंबामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर परिणाम होईल की नाही हे या क्षणी अस्पष्ट आहे, परंतु अनेकांना आशा आहे की हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करेल.

जवानच्या यशाची खात्री - जवान चित्रपटाची सर्वात जमेची बाब म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून अ‍ॅटली कुमार यांनी केलेले काम. आजपर्यंत त्यांनी बनवलेला एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही, त्यामुळे ते साऊथमधील १०० टक्के यशस्वी दिग्दर्शक मानले जातात. अलिकडेच त्यांचा एक तमिळ चित्रपट बिगिलने जागतिक स्तरावर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामुळे जवानच्या यशाची त्या अर्थाने खात्री बाळगली जात आहे.

दर्जेदार सिने निर्मितीमुळे विलंब- जवानच्या रिलीजला होत असलेला विलंब चाहत्यांसाठी निराशाजनक असला तरी, चित्रपटांना पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये विलंब होणे काही नवीन नाही. चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे अंतिम टप्पे अनपेक्षितपणे वेळखाऊ असू शकतात आणि निर्मात्यांनी हे सुनिश्चित करणे अत्यावश्यक असते. दर्जेदार निर्मितीसाठी असा विलंब होत असल्यास सहाजिकच निर्माते हा विलंब सहन करतात, असा आजवरचा अनुभव आहे.

हेही वाचा -The Kerala Story In Kochi : कोचीमध्ये 'द केरळ स्टोरी'चे शो रद्द, फक्त एकाच चित्रपटगृहात सिनेमा रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details