मुंबई- बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने नुकतीच फिल्म इंडस्ट्रीतील आपल्या कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. या संदर्भात अभिनेत्याने एक पोस्ट केली आहे. बॉलीवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचे पोस्टरही समोर आले, जे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरले.
बॉलीवूडमधील कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाहरुख खानने लिहिले की, "३० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मनोरंजनासाठी सेलिब्रेट करणे म्हणजे रात्रंदिवस काम करणे. तुम्हा सर्वांना प्रेम."
पठाण चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलायचे तर शाहरुख खान एका हातात बंदूक घेऊन उभा आहे. शाहरुखचा हा लूक पाहून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिले की, '३० वर्षे आणि आणखी मोजत नाही कारण तुमचे प्रेम आणि स्मित अमर्याद आहे. पठाण सोबत हा प्रवास चालू आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होईल. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे.''