मुंबई - Ira Khan-Nupur Shikhare Wedding Reception: अभिनेत्री आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खाननं अलीकडेच प्रियकरसोबत नुपूर शिखरेसोबत राजस्थानमधील उदयपूर येथे 10 जानेवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केलं. दरम्यान मुंबईत 13 जानेवारी झालेल्या लग्नाच्या रिसेप्शनला चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय जगतातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. शाहरुख खान पत्नी गौरी खानसह या ग्रँड रिसेप्शनमध्ये पोहोचला होता. दरम्यान या लग्नातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय या लग्नाच्या रिसेप्शनला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांनीदेखील हजेरी लावली.
शाहरुख खानसह गौरी खान दिसली पार्टीत : या पार्टीत शाहरुख खान काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला होता, तर गौरी खानने लाल बिंदीसह रेड कलरचा आउटफिट घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय पार्टीमध्ये सलमान खान ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. आयरा आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचलेल्या कलाकारांनी आमिर खानसोबत पोझ देऊन फोटो काढली. सलमान खान-शाहरुख खान, सीएम एकनाथ शिंदेसोबत रणबीर कपूर, शहनाज गिल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने आणि इतर कलाकारांनीही मुंबईत झालेल्या आयरा-नूपूरच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती.