महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shabana support The Kerala Story : शबाना आझमींचा द केरळ स्टोरीला पाठींबा, बहिष्काराची भाषा करणे घटनाबाह्य असल्याचे मांडले मत - शबाना आझमी

द केरळ स्टोरी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी काही संघटना व व्यक्ती करत आहेत. चित्रपटाला जेव्हा सेन्सॉर बोर्ड प्रमाणपत्र देते तेव्हा त्याला विरोध करणे घटानाबाह्य असल्याचे शबाना यांनी म्हटलंय.

शबाना आझमींचा द केरळ स्टोरीला पाठींबा
शबाना आझमींचा द केरळ स्टोरीला पाठींबा

By

Published : May 8, 2023, 3:51 PM IST

मुंबई- द केरळ स्टोरी या चित्रपटावरुन सध्या मनोरंजन विश्व तापले आहे. हा चित्रपट अलिकडे प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या विरोधात काही जण न्यायालयात गेले होते आणि धार्मिक भावना दुखावण्याचे कारण देत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालायाने चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवला आणि चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. केरळ सारख्या राज्यात अनेक संघनांनी द केरळ स्टोरीला विरोध करत निदर्शने केली. पोलिस बंदोबस्तात चित्रपटाचे प्रदरशन सुरू आहे.

शबाना आझमींचा द केरळ स्टोरीला पाठींबा- द केरळ स्टोरीला देशातील अनेक संघटना व व्यक्ती विरोध करत आहेत. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी चित्रपटाला पाठींबा दर्शवला आहे. शबाना यांनी एक ट्विट करुन लिहिलंय की, 'द केरळ स्टोरीला विरोध करणे तितकेच चुकीचे आहे जितके की, आमिर खाननच्या लाल सिंग चड्ढाला विरोध करणे. जेव्हा एखाद्या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्सकडून प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र मिळते तेव्हा कुणीही घटनेच्या तत्वांविरोधात जाऊन विरोध करता कामा नये.' अशा प्रकारे शबाना आझमी द केरळ स्टोरी चित्रपटाच्या समर्थनार्थ बोलल्या आहेत.

द केरळ स्टोरीला विरोध का होतोय? - द केरळ स्टोरी या चित्रपटाची कथा धर्मांतरीत करुन दहशतवादी संघटनात सहभागी झालेल्या महिलांची आहे. या चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला त्यात असा दावा करण्यात आला होता की ३२ हजार हिंदू महिला यांना केरळमध्ये धर्मांतरीत करुन व त्यांची फसवणूक करत आयसीस या खतरनाक धार्मिक दहशतवादी संघटनेत सामील करण्यात आले. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर यातील दावा खोटा व अतिशोयक्तीचा असल्याचा आरोप द केरळ स्टोरीचे निर्माता व दिग्दर्शकावर होऊ लागला. त्यांनंतर देशात चित्रपटाच्या बाजूने व विरोधात दोन गट तयार झाले.

बॉलिवूड चित्रपटावर बहिष्काराचा ट्रेंड- बॉलिवूड चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा नवा ट्रेंड काही वर्षापासून सुरू आहे. अलिकडेच याचा सर्वात मोठा फटका आमिर खानला बसला होता. त्याच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार घालण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटर्सकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर ब्रम्हास्त्र चित्रपटाविरोधातही असाच बहिष्काराचा पवित्रा घेण्यात आला. परंतु चित्रपटाने आपल्या मेरीटच्या जीवावर बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. पुन्हा एक प्रयोग शाहरुख खानच्या पठाणच्या बाबतीतही घघडला पण चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर आगमन करणाऱ्या शाहरुखला प्रेक्षकांनी चांगली साथ दिली. सलमानच्या किसी का भाई किसी की जानवरही बहिष्काराची भाषा बोलली गेली. परंतु त्यातही बहिष्काराची भाषा करणारे तोंडघशी पडले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बहिष्काराची भाषा आणि कृती करणे सर्वस्वी चुकीचे असल्याचा एक सूर आहे. नेमका हाच धागा पकडून शबाना आझमी यांनी दे केरळ स्टोरीला पाठींबा दर्शवला आहे.

हेही वादा -Sonam Kapoor Greets Uk Audience : सोनम कपूरने यूकेच्या प्रेक्षकांना 'नमस्ते' म्हणत कोरोनेशन कॉन्सर्टमध्ये केले अभिवादन

ABOUT THE AUTHOR

...view details