महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shabana Azmi Birthday: शबाना आझमी यांनी अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात केलं घर... - शबाना आझमीचं वैयक्तिक आयुष्य

Shabana Azmi Birthday: बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी या आज 73वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही त्यांची गणना इंडस्ट्रीतील नामवंत कलाकारांमध्ये केली जात असून त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Shabana Azmi Birthday
शबाना आझमीचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 11:40 AM IST

मुंबई - Shabana Azmi Birthday: बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीची गणना इंडस्ट्रीतील नामवंत कलाकारांमध्ये केली जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आजपर्यंत सर्वच भूमिका चोख बजावल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात त्यांनी खास स्थान निर्माण केलं आहे. दीर्घ काळ्याच्या विश्रांतीनंतर, त्या पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर आल्या आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात शबाना आझमी यांनी सुपरस्टार धर्मेंद्रला किस घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. दरम्यान, आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी शबाना आझमी 73 वर्षांच्या झाल्या आहेत. आजही शबाना आझमीची फॅन फॉलोइंग खूप जोरदार आहे.

कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी कॉफी विकली :शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी हैदराबाद येथे प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांच्या कुटुंबात झाला. शबाना यांनी फिल्मी करिअरपूर्वी अभ्यासादरम्यान असं काही काम केलं होतं की, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. शबाना यांनी 'सिनियर केंब्रिजमधून उत्तीर्ण झाल्यानंतर, कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, त्यांनी तीन महिने पेट्रोल स्टेशनवर कॉफी विकली. यातून त्या रोज 30 रुपये कमवत असं, याशिवाय त्यांनी आई-वडिलांच्या विरोधात बंड करून आपले वैवाहिक जीवन सुरू केले.

शबाना आझमीचं वैयक्तिक आयुष्य : शबाना आझमी या अभिनयासोबतच त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळेही खूप चर्चेत होत्या. शबाना आझमीची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. शबाना आझमी या शेखर कपूरसोबत जवळपास सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जावेद अख्तरनं प्रवेश केला. जावेद अख्तर कैफी आझमी यांच्या घरी कवितांचे धडे घेण्यासाठी जात असत. तिथेच त्यांना शबाना आझमी आवडू लागल्या. सुरुवातीला कैफी आझमीचा लग्नासाठी विरोध होता. पण जेव्हा जावेद अख्तरनं आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, तेव्हा त्यांनी शबाना आणि जावेदच्या लग्नाला होकार दिला. त्यानंतर शबाना आझमी यांनी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या जावेद अख्तरसोबत 9 डिसेंबर 1984मध्ये लग्न केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details