महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Section 108 exciting teaser: 'सेक्शन १०८' चा रंजक टीझर रिलीज, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी - नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रेजिना कॅसांड्रा

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी एक नवी पर्वणी समोर आली आहे. त्याच्या आगामी 'सेक्शन १०८' चित्रपटाची घोषणा झाली असून या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Section 108 exciting teaser
'सेक्शन १०८' चा रंजक टीझर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 7:44 PM IST

मुंबई- नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेल्या 'सेक्शन १०८' या आगामी चित्रपटाचा रंजक टीझर रिलीज करण्यात आला आहे. एका मोठ्या स्कॅमच्या पार्श्वभूमीवर इन्शूरन्स कन्सल्टंटच्या समोर एक केस येते. यामध्ये एक मिलेनियर आहे, जो काही वर्षापासून गायब आहे. आता लवकरच त्याला न्यायालय मृत घोषित करणार आहे. तसे जर झालं तर नामांकन केलेल्या व्यक्तीला एक मोठी रक्कम इन्शुरन्स कंपनीला परत करावी लागणार आहे. हा एक घोटाळा असू शकतो, असे इन्शूरन्स कन्सल्टंट नवजुद्दीन सिद्दीकीला अभिनेत्री रेजिना कॅसांड्रा सांगताना टीझरच्या सुरुवातीलाच सुरूवातीलाच दिसते. यामुळे चकित झालेला नवाझ ही केस स्वीकारण्याचे आव्हान घेतो. 'सेक्शन १०८' ची ही खूपच रंजक केस असल्याचे तो सांगतो. तो जर जमिनीत जरी पुरला असेल तरी त्याला खोदून बाहेर काढेन, असे आव्हान घेऊन तो कामाला लागतो.

ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या X वर ( पूर्वीचे ट्विटरवर ) हा ट्रेलर शेअर करत ही बातमी कळवली आहे. त्यांनी लिहिलंय की, 'नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रेजिना कसांद्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'सेक्शन 108' चित्रपटाचा टीझर आला आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रिलीज होईल. थ्री अ‍ॅरोज प्रोडक्शन आणि सिनेमावाला या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.'

टीझर पाहिल्यानंतर 'सेक्शन १०८' हा एक रहस्यमय रंजक चित्रपट असल्याची खात्री पटते. रसिक खान यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शत केलेला हा चित्रपट अनिस बाझ्मी प्रेझेन्ट करणार आहेत. हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'सेक्शन १०८' या चित्रपटात नावाजुद्दीन सिद्दीकीसह अभिनेत्री रेजिना कॅसांड्रा, आसिफ खान, रुमी खान, सानंद वर्मा, अलीशा ओहरी आणि सहर्ष कुमार शुक्ल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अंकित कुमार पांडे, पार्थ सारथी मन्ना, सैफुल्ला खान, सोफिया अग्रवाल, मनीष किशोर, राकेश डांग, मेघ श्याम गुप्ता, श्रवण अग्रवाल, राकेश कपूर यांनी मिळून केली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रेजिना कॅसांड्रा

ABOUT THE AUTHOR

...view details