महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Satyaprem Ki Katha trailer: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा रोमँटिक सत्यप्रेम की कथाचा ट्रेलर रिलीज - सत्यप्रेम की कथा या चित्रपटात सुप्रिया पाठक

समीर विद्वांस दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला सत्यप्रेम की कथा हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा रोमँटिक ट्रेलर रिलीज झाला आहे.

Satyaprem Ki Katha trailer
सत्यप्रेम की कथाचा ट्रेलर रिलीज

By

Published : Jun 5, 2023, 2:00 PM IST

मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही अलिकडेच गाजलेल्या भूल भुलैया 2 ची जोडी पुन्हा एक धमाका करण्यासाठी सज्ज झाली. सत्यप्रेम की कथा या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. अखेर या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

सत्यप्रेम की कथाचा ट्रेलर- दोन मिनिटे-तीस-सेकंदाचा ट्रेलर सत्यप्रेम (कार्तिक आर्यन) च्या गुजराती दुनियेची एक झलक दाखवणारा आहे. कथा ( कियारा अडवाणी ) ही आधीच तपन नावच्या व्यक्तीच्या प्रेमात असलेली मुलगी त्याच्या प्रेमात पडते आणि एक रोमँटिक कथा पडद्यावर साकार होताना ट्रेलरमधून दिसत आहे. त्यांच्या या लव्हस्टोरीमध्ये अनेक विघ्नेही येताना दिसतात. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट समीर विद्वांस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला आणि नमाह पिक्चर्स निर्मित आहेत.

सत्यप्रेम की कथाचे पहिले गाणे- ट्रेलरच्या प्रीमियरपूर्वी 27 मे रोजी चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले. नसीब से असे शीर्षक असलेल्या या गाण्याला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे आणि यूट्यूबवर आतापर्यंत या गाण्याला 29 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पायल देव आणि विशाल मिश्रा यांनी ते सुंदर गायले आहे. गाण्याचे आकर्षक बोल आणि चाल खरोखरच मंत्रमुग्ध करणारी आहे. या गाण्यात कार्तिक आणि कियारा यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री पुन्हा एकदा आधोर्खीत झाली होती.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटात सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, राजपाल यादव, अनुराधा पटेल, निर्मिते सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही भूमिका आहेत. सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे हे मूळ नाव सत्य नारायण की कथा असे होते, परंतु निर्मात्यांनी विनाकारण वादाच्या भोवऱ्यात सापडू नये म्हणून शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details