मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'ने पहिल्या वीकेंडमध्ये 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट जवळपास 60 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. जिथे पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 50.61 कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, आता कार्तिक-कियारा यांच्या नवीन चित्रपटाच्या आठव्या दिवसाचा कलेक्शन रिपोर्ट समोर आला आहे. रिलीजच्या आठव्या दिवशीही चित्रपटाचा वेग मंदावला आहे.
कमाईत घसरण : रिलीजच्या पाचव्या दिवसापासून 'सत्यप्रेम की कथा'च्या कलेक्शनचा आलेख सातत्याने घसरत आहे. सोमवारी या चित्रपटाने 4 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर मंगळवारी आणि बुधवारी चित्रपटाने 3.75 कोटी आणि 4 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशाप्रकारे, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर एकूण 50.21 कोटींचा गल्ला जमला आहे. आता, दुसऱ्या वीकेंडच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या 8 व्या दिवशी, चित्रपटाने सुमारे 3.4 कोटींचा व्यवसाय केला आहे, .यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 54.11 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर कार्तिक आर्यनने चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. गुरुवारी, त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, या पोस्टमध्ये त्याचे हात जोडलेले आणि पांढरा हार्टचा इमोजीने त्याने पोस्ट केली आहे.