महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Lokesh Kanagaraj's birthday : संजय दत्तने लिओ दिग्दर्शक लोकेश कनागराजच्या वाढदिवसानिमित्त लिहिली दिलखुलास चिठ्ठी - दिग्दर्शक लोकेश कनगराज

संजय दत्तने लिओ चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या वाढदिवसानिमित्य एक फोटो शेअर करत एक सुंदर नोट लिहिली आहे. दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजयने त्याला आपला मुलगा म्हटले आहे.

संजय दत्त आणि  लिओ चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज
संजय दत्त आणि लिओ चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज

By

Published : Mar 14, 2023, 5:25 PM IST

मुंबई- दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने एक भावूक चिठ्ठी लिहिली आहे. लोकेश कनागराजच्या आगामी चित्रपट लिओमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या संयूबाबाने लोकेशसोबत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. संजयने फोटोला पोज देताना लोकेशला घट्ट मिठी मारली आहे. फोटोत संजयने लोकेश आपला कुटुंबाचा भाग असून तो आपला मुलगा असल्याचे म्हटलंय.

त्याच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करत संजयने लिहिले, माझा भाऊ, मुलगा, कुटुंब असलेल्या लोकेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुला अधिक यश, शांती, आनंद आणि संपत्ती देवो, मी आयुष्यभर तुमच्यासोबत आहे, आशीर्वादित राहा, असे त्याने लिहिले आहे. फोटो पोस्ट करताच त्याच्या फॉलोअर्सनी त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.

आदल्या दिवशी रिलीज झालेल्या सेटवरील फोटोत असे दिसून आले की लोकेशने लिओ टीमसोबत वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केले होते. आतील फोटो हळूहळू सार्वजनिक होत असताना, व्हायरल झालेला एक फोटो लोकेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाचा आहे. लिओ या चित्रपटात थलपथी विजयची महत्त्वाची भूमिका आहे आणि निर्माता जगदीश पलानीसामी यांनी शनिवारी एका टीझर व्हिडिओसह संजय दत्तच्या कास्टिंगचा खुलासा केला.

लिओ हा विजयचा मुख्य अभिनेता म्हणून 67 वा चित्रपट आहे आणि जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदा औपचारिकपणे घोषित करण्यात आला तेव्हा या चित्रपटाला थलपथी 67 असे वर्किंग टायटल देण्यात आले होते. चित्रपटाचे अधिकृत शीर्षक काही दिवसांनंतर उघड झाले आहे. विजयसोबत या चित्रपटात गौतम मेनन आणि प्रिया आनंद यांच्याही भूमिका आहेत. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, तृषा कृष्णन, पोन्नियिन सेल्वनमधील तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री, विजयसोबत सहकलाकार असणार आहे. 14 वर्षांनंतर विजय आणि त्रिशाचा हा डेब्यू सिनेमा आहे. देघेही तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील नावाजलेले कलावंत आहेत. विजयचा अलिकडेच वारिसु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाचे आता अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रिमिंग सुरू झाले आहे. हिंदीसह इतर भाषात हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details