मुंबई :बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला अभिनयासोबतच त्याच्या साईड बिझनेससाठी ओळखले जाते. संजय दत्तप्रमाणे असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स तसेच अनेक साइड बिझनेस देखील आहेत. सध्याला संजय दत्त त्याच्या साईड बिझनेसमुळे प्रकाशझोतात आला आहे. संजय दत्तने एका दारू कंपनीत गुंतवणूक करून नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. त्याने अल्कोहोल आणि बेव्हरेज स्टार्टअप कार्टेल आणि ब्रदर्सशी हातमिळवणी केली आहे. या कंपनीच्या सहकार्याने संजय दत्तने 'द ग्लवॉक' नावाचा स्कॉच व्हिस्की ब्रँड लॉन्च केला आहे.
संजय दत्तने केली गुंतवणूक : विशेष म्हणजे, अल्कोहोल कंपनी 'द ग्लेनवॉक' भारतात आपल्या दारूच्या ब्रँडची निर्यात आणि किरकोळ विक्री करण्याचा विचार करत आहे. कंपनीने मॉर्गन बेव्हरेजेस कंपनीसह लिव्हिंग लिक्विड्सचे सैनी आणि ड्रिंक बार अकादमीचे जेएस मेरानी यांच्याशीही हा करार केला आहे. दरम्यान भारतात दारूचा बाजार वाढत असून संजय दत्तबद्दल असे बोलले जात आहे की, तो योग्य वेळी या व्यवसायात उतरला आहे. स्कॉच व्हिस्की असोसिएशनच्या अहवालानुसार, 2022 मध्ये भारत स्कॉच व्हिस्की मार्केटच्या निर्यातीत फ्रान्सपेक्षा खूप पुढे गेला आहे. अहवालानुसार, भारतात या व्यवसायात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.