मुंबई - Sam Bahadur Teaser Date: विक्की कौशल हा सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मुळे चर्चेत आहे. यापूर्वी त्यानं 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'सरदार उधम' यासारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान आता 'सॅम बहादूर' चित्रपटाबाबत एक मोठं अपडेट समोर आले आहे. या चित्रपटाची टीझरची रिलीज डेट समोर आली आहे. 'सॅम बहादूर' चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता 'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीझर 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीझरबाबत अपडेट :मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या चित्रपटात विकी कौशल भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विक्की कौशलने 2022मध्ये सोशल मीडियावर 'सॅम बहादूर' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. या चित्रपटामधील विक्कीचे लूक हुबेहूब फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ सारखे करण्यात आले आहे. 'सॅम बहादूर'चा टीझर रिलीज करण्यासाठी निर्मात्यांनी आयसीसी (ICC ) क्रिकेट विश्वचषक 2023 च्या मोठ्या सामन्याचा दिवस निवडला असल्याचं समजत आहे. या सामन्याच्या निमित्तानं 'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीझर हा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.