महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tiger 3 New Song : 'लेके प्रभु का नाम' गाण्यातील कतरिनाच्या लूकवर सलमान खान फिदा... - सलमान खाननं शेअर केले कॅटचे फोटो

Tiger 3 New Song : सलमान खानचा 'टायगर 3' हा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटमधील 'लेके प्रभु का नाम' हे गाणं रिलीज होण्यासाठी सज्ज झालं आहे.

Tiger 3 New Song
टायगर 3मधील गाणं

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 5:28 PM IST

मुंबई - Tiger 3 New Song : सध्या सलमान खान त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'टायगर 3'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'टायगर 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. नुकताच 'ले के प्रभु का नाम' या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला. हा टीझर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. सलमान खानने या गाण्यातील कतरिना कैफचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कॅट खूप हॉट दिसत आहे. सध्या तिचे दोन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सलमान खाननं शेअर केले कॅटचे फोटो :कतरिनाचे दोन फोटो शेअर करत दबंग खाननं लिहिलं, 'कॅट, तू खळबळ उडवून दिली आहेस. तुझ्यासोबत नाचण्यात मला नेहमीच आनंद मिळतो. 'लेके प्रभु का नाम' या 23 ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या या पार्टी ट्रॅकसह टायगर आणि झोयाला भेटा. 12 नोव्हेंबरला टायगर तुम्हाला थिएटरमध्ये भेटायला येणार आहे'. आता सध्या सलमानची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय कतरिनानं देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हेच फोटो चाहत्यासोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'आ रहे है हम 'लेके प्रभू का नाम' 23 ऑक्टोबरला. 'टायगर 3' 12 नोव्हेंबरला सिनेमागृहात हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होईल'.

चाहत्यांनी पोस्टवर केल्या कमेंटस् :कतरिना कैफ आणि सलमान खानच्या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका यूजरनं पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'भाई अजूनही कतरिनावर प्रेम करतो'. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, 'कतरिना ही खूप सुंदर दिसतेय.' त्यानंतर आणखी एकानं पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'या चित्रपटाची मी खूप आतुरतेनं वाट पाहत आहे'. या पोस्टवर अनेकजण कतरिनाच्या किलर लूकचे कौतुक करतायत. 'ले के प्रभु का नाम' हे गाणं 23 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटांध्ये सलमान हा अ‍ॅक्शन अवतारात प्रेक्षकांना दिसेल. याशिवाय या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा :

  1. Kajol And Ddlj : 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 28 वर्षे पूर्ण, काजोलनं शेअर केली पोस्ट
  2. Tejas Special Screening: संरक्षण मंत्री आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी 'तेजस'चं स्पेशल स्क्रीनिंग
  3. Kajol Durga Puja : जुहूच्या सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवात झळकली काजोल, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details