मुंबई- सुपरस्टार सलमान खानने ( Superstar Salman Khan ) सोमवारी सांगितले की, दक्षिणेतील चित्रपट खरोखर चांगली कामगिरी करत आहेत आणि प्रत्येक कलाकाराला चांगला चित्रपट बनवायचा असला तरी बॉक्स ऑफिसवर यशाची हमी देणारे कोणतेही सूत्र नाही. अभिनेता किच्चा सुदीपच्या ( Kichcha Sudeepa ) आगामी कन्नड कल्पनारम्य अॅक्शन-अॅडव्हेंचर फिल्म 'विक्रांत रोना'ची ( Vikrant Rona ) हिंदी आवृत्ती सलमान खान सादर करणार आहे.
चित्रपटाच्या एका विशेष कार्यक्रमात सलमान खानने कलाकारांशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री नीथा अशोक म्हणाली की बॉलीवूड सुपरस्टारने ट्विटरवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केल्याचे पाहून ती थक्क झाली. यावर सलमान खान म्हणाला, "मी देखील चित्रपट सादर करत आहे! मला हे (प्रमोशन) करावे लागेल. मला तोट्यात जायचे नाही... साऊथचे चित्रपट खरोखर चांगले काम करत आहेत."
सलमानला विश्वास आहे की यशस्वी चित्रपट देण्यासाठी कोणतेही सूत्र नाही. "आम्ही सर्वजण सर्वोत्तम चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो, तो सर्वांपर्यंत पोहोचावा अशी आमची इच्छा असते. कधी त्या य़श मिळते तर कधी नाही. यात काही 100 टक्के काम होईल, असे कोणतेही सूत्र नाही," असे तो म्हणाला.