मुंबई - सलमान खान आणि पूजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नैयो लगदा या बहुप्रतीक्षित गाण्याचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. सलमान खानच्या चर्चेत असलेल्या चित्रपटातील हे पहिले गाणे आहे. नैयो लगदा हे लडाखच्या नयनरम्य खोऱ्यात सेट केलेले प्रेमगीत पाहाता क्षणीच प्रेक्षकांच्या मनात बसले आहे. सध्या सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनसाठी परफेक्ट गाणे प्रेक्षकांना मनाचा ठाव घेत आहे.
या गाण्यात सलमान आणि पूजा हेगडे झळकले आहेत, आणि दोघांमधील केमिस्ट्री खूपच परफेक्ट दिसत आहे. लडाखमधील सुंदर आणि रमणीय लोकेशन्सने रोमान्सचा भाग अनेक स्तरांवर नेला आहे. नैयो लगदा टीझरने चाहत्यांना आणखी काही वेळ प्रतीक्षा करायला भाग पाडले होते. परंतु ही प्रतीक्षा आता संपली असून झी म्युझिक कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर या गाण्याचा व्हिडिओ सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे.
काहींना खटकल्या सलमानच्या स्टेप्स - सलमान आणि पूजा हेगडेची केमेस्ट्री सलमानच्या चाहत्यांना आवडत असली तरी काहींना ती खूपच खटकली आहे. यामध्ये त्याच्या स्पेप्स कवायत करत असल्यासारख्या वाटतात. त्यामुळे सलमानला ट्रोलही करण्यात येत आहे. तर अनेकांनी त्यावर मीम्सही बनवल्या आहेत.
नैयो लगदा या गाण्याच्या माध्यमातून सलमान खान आणि संगीतकार हिमेश रेशमिया पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हिमेश रेशमियाने यापूर्वी सलमानसाठी तेरी मेरी, तेरे नाम शीर्षक गीत, तू ही तू हर जगह यासारखी ब्लॉकबस्टर गाणी संगीतबद्ध केली आहेत. शब्बीर अहमद आणि कमाल खान आणि पलक मुच्छाल यांच्या गीतांसह, नैयो लगदासाठी हिमेश रेशमिया सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील गीतांचा संगीतकार आहे.
बुधवारी सलमानने जाहीर केले की, किसी का भाई किसी की जानचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे आणि झी स्टुडिओजवर जगभरात रिलीज होणार आहे.
सलमानचा आगामी चित्रपट- सलमान खानचा टायगर ३ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान झळकणार अशी चर्चा गेली अनेक दिवसापासून रंगत होती. नुकतेच यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी लिहिले की, 'शाहरुख खान आणि सलमान खान यांनी पठाण या चित्रपटात कामालीची जादू केली. हे दोन दिग्गज स्टार्स दिवाळीला रिलीज होणाऱ्या टायगर ३ मध्ये पुन्हा एकत्र येणार आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालेल यात कोणतीच शंका नाही.
हेही वाचा -Lalita Azmi Passed Away : ज्येष्ठ चित्रकार ललिता आझमी यांचे वयाच्या ९० वर्षी मुंबईत निधन