मुंबई - Salman and Cristiano Ronaldo : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान सध्या सोशल मीडियावर चित्रपटाशिवाय इतर कारणामुळे सध्या चर्चेत आहे. अलिकडे तो सौदी अरेबियात बॉक्सिंगचा सामना पाहण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल लिजंड क्रिस्टियानो रोनाल्डोही आला होता. यावेळचे सलमान आणि रोनाल्डोचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. फोटो पाहून काहींनी असाही दावा केला की रोनाल्डोने उघडपणे सलमान खानकडे दुर्लक्ष केलंय.
मात्र त्यानंतर पुढच्याच क्षणी असे काही फोटो समोर आले ज्यात सलमान आणि रोनाल्डो एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. सलमान-रोनाल्डोच्या या फोटोंनी त्या उपद्रवी बातम्यांना पूर्णविराम मिळाला. आता पुढची एक बातमी सलमान बाबतीत समोर आली आहे.
खरतंर सिया नावाच्या एका एक्स युजरनं सलमान खान आणि रोनाल्डोचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून या यूजरनं सलमान खानच्या व्यक्तिरेखेचं कौतुक केलंय. तिनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की त्यानं आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल कधीच वाईट बोललेला नाही. तो नेहमी लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो, द्वेष आणि तिरस्काराचा सामना करूनही तो हसत राहतो. त्याच्यासोबत बसलेल्या व्यक्तीकडं तो वळूनही पाहात नाही. तो बॉलिवूडचा संयमी आणि शांत किंग आहे.
अलीकडेच रियाध सौदी अरेबिया येथे पार पडलेल्या टायसन फ्युरी आणि फ्रान्सिस नगानौ यांच्यातील बॉक्सिंग सामन्यासाठी सलमान खान हजर होता. यावेळी त्यानं लोकप्रिय फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज यांच्या शेजारी बसून खेळाचा आनंद घेतला. एकाच फ्रेममधील दोघांचे व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले नाहीत तरच नवल. चाहत्यांनी या दोघांना एकत्र पाहून आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त करयला सुरुवात केली.