मुंबई- ईदच्या खास प्रसंगी चाहत्यांना शुभेच्छा देण्याची वार्षिक परंपरा कायम ठेवत, बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांनी चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. बॉलीवूडच्या 'भाई'ची झलक पाहण्यासाठी सलमान खानच्या चाहत्यांनी सुपरस्टारचे निवासस्थान, गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर मोठ्या संख्येने रांगा लावल्या होत्या. 'किंग खान' शाहरुख खानचे चाहतेही त्याच्या निवासस्थानी, मन्नत बाहेर त्याला पाहण्यासाठी वाट पाहत होते.
चाहत्यांच्या मागणीनुसार सलमान घराच्या बाल्कनीत आला व चाहत्यांना अभिवान करीत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सलमानने नेव्ही-ब्लू कुर्ता घातला होता आणि 'टायगर जिंदा है' चित्रपटातील त्याच्या लुकसारखीच दाढी ठेवली होती. सलमानने देशभरातील आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुखने त्याच्या घरासमोर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केले आणि पोज दिली. लोक त्यांच्या आवडत्या स्टारची झलक पाहण्यासाठी मन्नत बंगल्याच्या बोहेर त्याची वाट पाहत होते. शाहरुखला गेटवर चढून त्याची आयकॉनिक पोझ पाहण्यासाठी चाहते तासन्तास धीराने वाट पाहत होते. हा अभिनेता फिकट निळ्या रंगाच्या डेनिम जीन्ससह जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि उत्कृष्ट काळा सनग्लासेस घालून त्याच्या हजारो निष्ठावंत चाहत्यांसह सेल्फी काढताना दिसला. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना शाहरुखने लिहिले, "ईदच्या दिवशी तुम्हा सर्वांना भेटून किती आनंद झाला.... अल्लाह तुम्हाला प्रेममय आनंद देवो. ईद मुबारक!!"ईदच्या दिवशी आज सलमान आणि शाहरुख यांनी आपल्या घरीच राहून चाहत्यांना दर्शन दिले. चाहत्यांसाठी ही मोठी ईदी मानली जात आहे.
वर्क फ्रंटवर सलमान आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल आणि आयुष शर्मा यांच्यासोबत दिसणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार्या 'पठाण' द्वारे शाहरुख खान अखेर 4 वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. याशिवाय SRK ने राजकुमार हिरानी सोबत 'डंकी' या चित्रपटात काम करणार असल्याचे चाहत्यांना कळवले आहे.
हेही वाचा -पाठकबाई आणि राणादाचा आयुष्यभरासाठी एकमेकात 'जीव रंगला'!!