महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सलमान आणि चिरंजीवी अॅक्शन मुडमध्ये, पॉलिटिकल ड्रामा गॉडफादरचा ट्रेलर रिलीज - Chiranjeevi Godfather

सुपरस्टार चिरंजीवी, सलमान खान आणि नयनतारा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गॉडफादर चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. मोहन राजा दिग्दर्शित गॉडफादर चित्रपटाचा ट्रेलर आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे झालेल्या प्री-रिलीझ इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला.

गॉडफादरचा ट्रेलर रिलीज
गॉडफादरचा ट्रेलर रिलीज

By

Published : Sep 29, 2022, 10:33 AM IST

हैदराबाद- चिरंजीवी, सलमान खान आणि नयनतारा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गॉडफादर चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ट्रेलर पीकेआर नावाच्या मुख्यमंत्र्यांच्या मृत्यूने सुरू होतो आणि त्याच्या उत्तराधिकारीबद्दल प्रश्न निर्माण होतात. त्यानंतर ब्रम्हा म्हणजेच चिरंजीली एन्ट्री होते. ब्रम्हाचे चाहते खूप मोठे आहेत परंतु राजकीय जगात त्याचे अनेक शत्रू देखील आहेत. व्हिडिओच्या शेवटी, ट्रेलरमध्ये सलमान खानची एन्ट्री होती. यात तो जबरदस्त अवतारात पाहायला मिळत आहे. यात नयनतारा आणि सत्यदेव कांचरना यांच्या पात्रांची झलकही पाहायला मिळते, जे सत्तेच्या लढाईच्या मध्यभागी आहेत.

मोहन राजा दिग्दर्शित गॉडफादर चित्रपटाचा ट्रेलर आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे झालेल्या प्री-रिलीझ इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला. चिरंजीवीनेही त्याच्या ट्विटर हँडलवर ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, "गॉडफादर विजयादशमीला येत आहे." खालील पोस्ट पहा:

गॉडफादर हा मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन अभिनीत मल्याळम चित्रपट लुसिफरचा अधिकृत रिमेक आहे. कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि सुपर गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित, पॉलिटिकल अॅक्शन ड्रामाची तेलुगू आवृत्ती ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे.

हेही वाचा -Drishyam 2 : अजय देवगणच्या दृष्यम २ पोस्टरने उत्कंठा वाढवली, टीझरची प्रतीक्षा सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details