महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'केजीएफ' स्टार यशच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री - कन्नड सुपरस्टार यश

Yash : कन्नड सुपरस्टार यशचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे.

Yash
यश

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 6:48 PM IST

मुंबई - Yash :कन्नड सुपरस्टार यशनं त्याच्या 'केजीएफ' (KGF) आणि 'केजीएफ 2' (KGF 2) या ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलं आहे. या चित्रपटांमुळं त्याला पॅन इंडिया सुपरस्टारचा दर्जा मिळाला आहे. आता प्रेक्षक त्याच्या आगामी चित्रपटांची वाट आतुरतेनं पाहात आहेत. अलीकडेच, त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती समोर आली आहे, जी सध्या 'यश 19' या नावानं प्रसिद्ध आहे. 8 डिसेंबर रोजी तो त्याच्या चित्रपटाच्या शीर्षकाचं अनावरण करणार आहे. या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

या अभिनेत्रीचा प्रवेश होईल : यशच्या आगामी चित्रपटात साई पल्लवी मुख्य भूमिकेत असल्याचं समोर आलं आहे. सध्या या संदर्भात कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. मात्र निर्मात्यांनी अभिनेत्रीशी संपर्क साधल्याची सर्वत्र चर्चा आहे. या बातमीमुळं यश आणि साईच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. यशच्या या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास करणार आहे. हा चित्रपट गोवा माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित असेल. यश त्याच्या आगामी चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. 'यश 19' मधून बॉक्स ऑफिसवर धमाल करणारा रॉकी भाई अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

शीर्षकाची घोषणा या दिवशी होईल : यशच्या आगामी चित्रपटाची घोषणा 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9:55 वाजता होईल. यशच्या अधिकृत पोस्टमुळं चाहत्यांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. या चित्रपटाची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन करणार आहे. दरम्यान साई पल्लवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'एसके 21' (SK 21)मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट कमल हासन प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होत आहे. याशिवाय ती पुष्पा 2'मध्येही दिसेल, मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. साई पल्लवीनं नुकतेच चंदू मोंडेती दिग्दर्शित नागा चैतन्यच्या 'थंडेल' या आगामी चित्रपटात भूमिका नाकारली होती. याशिवाय ती राम चरणच्या आगामी चित्रपटातही दिसेल अशी अफवा आहे. या चित्रपटाचं तात्पुरतं शीर्षक 'आरसी 16' (RC 16) आहे.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल' पाहिल्यानंतर अर्शद वारसीनं केलं रणबीर कपूरचं कौतुक
  2. अमिताभ बच्चनसह अनेक सेलेब्सनं 'द आर्चीज'च्या स्पेशल स्क्रिनिंगला लावली हजेरी
  3. सना रईस खाननं काम करण्यास नकार दिल्यानं बिग बॉसमध्ये गृहकलह

ABOUT THE AUTHOR

...view details