मुंबई - बॉलिवूड सेलेब्रिटींचा लोकप्रिय डिझायनर मनीष मल्होत्रानेमुंबईतील आपल्या घरी एक स्नेहसमारंभाचे आयोजन केले होते. त्याने यातील काही खास क्षण चित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यासह जान्हवी कपूर, परिणीती चोप्रा, खूशी कपूर, मनीष मल्होत्रा त्यांच्या जीवलग मित्रांसोबत पोज देताना दिसले.
दिवसभराच्या कामानंतर श्रमपरिहार म्हणून अशा संध्याकाळ आरामदायी आणि मजेशीर असतात. खास करुन रेखाजी, परिणीती चोप्रा, जान्हवी कपूर, खुशी यावेळी ब्लॅक आउटफिट्समध्ये ट्विनिंग करताना दिसले. रेखा यांनी काळा को-ऑर्ड सेट, काळ्या आणि पांढर्या पट्टेदार हेडवॅपसह जोडला होता. या ड्रेसमध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या.
मनीषने पोस्ट के्यानंतर नेटिझन्सनी यावर लगेचच प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. या फोटोमधील रेखा यांच्या लूकवर, पोजवर प्रेक्षक खूश असल्याचे दिसले. या वयातही त्यांचे सौंदर्य आकर्षक दिसत असल्याने त्या खऱ्या अर्थाने सदाबहार अभिनेत्री आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. मनीष मल्होत्राच्या पाठोपाठ परिणीती चोप्रानेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत परिणिती डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिग्गज कलाकारांसोबत पोझ देताना दिसते.
मनीष मल्होत्राने अलीकडेच मुंबईतील कॉउचर शोमध्ये आपले नवीन कलेक्शन लाँच केले. यावेळी अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या डिझायनरसाठी शोस्टॉपर बनले होते. अनेक सेलेब्रिटी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान करण्यासाठी उत्सुक असतात. केवळ फॅशन शो नाही तर राष्ट्री आणि आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेन्टमध्ये त्याच्या डिझाईन्सची मोठी चर्चा असते. या शिवाय जेव्हा सेलेब्रिटींची डेस्टिंग वेडिंगची चर्चा सुरू होते तेव्हा वधू वरांच्या ड्रेसचीही चर्चा होत असते. हे पोशाथ मनीषनेच डिझाईन केलेले असतात.