मुंबई - बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी जोडप्यांपैकी एक रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. चाहते आता ते पालक होण्याची वाट पाहत आहेत. कारण, बॉलीवूड आणि टीव्ही स्टार्सचे पालक बनल्याच्या बातम्या रोज येत आहेत. अशा परिस्थितीत या जोडीची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे, जे लवकरच या जोडप्याच्या घरातून आनंदाची बातमी ऐकण्यास उत्सुक आहेत. पण दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. आता एका मुलाखतीत रणवीर सिंगने बेबी प्लॅनिंगबाबत मोठा खुलासा केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जयेशभाई जोरदार' अभिनेता रणवीर सिंगने एका मुलाखतीत बेबी प्लॅनिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत जेव्हा रणवीर सिंगला मुलाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा रणवीरने सांगितले की तो आणि दीपिका भविष्याचे नियोजन करण्यासाठी आणि इतर गोष्टींबद्दल बोलत आहेत. त्याने सांगितले की त्यांचे वैवाहिक जीवन उत्तम सुरू असून आता वेळ येऊन ठेपली आहे. शिवाय करियरही योग्य मार्गावरुन जात आहे.