मुंबई - Randeep hooda : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं म्हणजे रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांचा 29 नोव्हेंबर रोजी विवाह पार पडला. मणिपूर येथील इम्फाळमध्ये मेईतेई पद्धतीनं त्यांनी विवाह केला. दरम्यान 11 डिसेंबर रोजी या जोडप्यानं मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केले होते. आता रणदीप आणि लिन यांनी रिसेप्शनमधील त्यांचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडप्याचे फोटो खूप जबरदस्त आहेत. रणदीप आणि लिन त्यांच्या रिसेप्शन खूप सुंदर दिसत आहे. या जोडप्यानं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
रणदीप आणि लिनचं लूक : रिसेप्शनमध्ये, रणदीप काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. याशिवाय लिननं लाल रंगाची चमकदार साडी नेसली होती. यावर तिनं हलका मेकअप केला होता. याशिवाय तिनं केस बनमध्ये बांधले होते. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं नेकलेस आणि यावर सुंदर मॅचिंग इयररिंग्स घातले होते. या जोडप्याचे दोन्ही पोशाख डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांनी डिजाइन केले आहे. रिसेप्शनमधील फोटो शेअर करताना रणदीपनं कॅप्शनमध्ये लिहिल, 'आमच्या मनाच्या ईडन गार्डनमध्ये'. आता या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.