मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी जेव्हा ते पालक होणार असल्याचे जाहिर केले तेव्हापासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. अशातच अलीकडेच रणबीरने त्याच्या चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्याने जुळी मुले होत असल्याची हिंट मोठी दिली होती.
रणबीरच्या फिल्म कंपेनियनच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील त्याच्या पहिल्या मुलाबद्दलची चर्चा झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रणबीर कपूर दोन सत्य आणि एक खोटे असा खेळ खेळताना दिसला, जेव्हा त्याने आपल्या उत्तराने सर्वांना चकुित करुन सोडले आहे.
"मला जुळी मुलं होत आहेत, मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे, मी कामातून दीर्घकाळ विश्रांती घेत आहे," असे तो या व्हिडिओमध्ये म्हणत होता.
व्हिडिओमधील त्याच्या विधानानंतर, सोशल मीडियावरील नेटिझन्स वेडे झाले आणि या जोडप्याला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे की नाही याबद्दल शंका व्यक्त करु लागले. एका युजरने लिहिले, "काय बरोबर आहे? खोटे काय आहे? माझ्या मते, "मला जुळे होणार आहेत" हे खोटे आहे, कारण रामायण होणार आहे, त्यासाठी तो चर्चेत आहे आणि यासाठी तो दीर्घ विश्रांती घेणार आहे. तयारीसाठी ब्रह्मास्त्रानंतर काही महिन्याचा ब्रेक तो घेणार आहे.''
दुसर्या युजरने ट्विट टाकले की, "त्याला आता जुळे होणार आहे याबद्दल मला खात्री आहे. शेवटचे नक्कीच खोटे आहे." आणखी एका युजरने भावूक होऊन लिहिले, "रणबीरला जुळी मुले होणार आहेत. मला आशा आहे की हे खरे आहे, मला विश्वास आहे की तो खरा आहे." "कामातून लांबलेला ब्रेक खोटा वाटतो कारण तो नुकताच परतला आहे. शिवाय, त्याच्याकडे ब्रह्मास्त्र (अॅनिमल आणि लव रंजनचा रॉमकॉम) नंतर आणखी 2 चित्रपट आहेत. शिवाय, ब्रह्मास्त्र 2 आणि 3 देखील लाइनमध्ये आहेत. निर्माते 2032 पर्यंत थांबणार नाहीत," असे एकाने ट्विटमध्ये सांगितले.