मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई वडील होणार आहेत. या गुड न्यूजची या जोडप्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही आनंदाची बातमी असतानाच रणबीर आणि आलियाचा पहिला एकत्रित आगामी चित्रपट ब्रह्मास्त्र रिलीज होईपर्यंत चाहते संयम बाळगून आहेत. अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र दिसले होते. यावेळी रणबीरने पत्नी आलियाच्या गर्भधारणेमुळे तिच्या वाढत्या पोटाची खिल्ली उडवली होती. आता रणबीरने पत्नी आलिया भट्टच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.
खरं तर रणबीरने ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनवर आलिया भट्टच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली असून मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि मी फक्त एक विनोद म्हणून घेत होतो. मी त्या वाईट विनोदाबद्दल आलिया भट्टच्या सर्व चाहत्यांची माफी मागतो, असे रणबीर म्हणाला.
नुकताच प्रदर्शित झालेला शमशेरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर ब्रह्मास्त्' चित्रपटाकडून रणबीरला मोठ्या आशा आहेत. आता कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवाना झाले आहेत. रणबीर कपूर पहिल्यांदा चेन्नईला गेला होता. इथे तो एकटा नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सशक्त दिग्दर्शक एसएस राजामौली आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुनसोबत पोहोचला होता.
सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये रणबीर एसएस राजामौली यांच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर दक्षिण भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राजामौली आणि नागार्जुन रणबीरसोबत साऊथ इंडियन फूडही खाताना दिसत आहे.