मुंबई - Animal OTT Version:अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अॅनिमल' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाला नुकतेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशकडून (सेन्सॉर) 'ए' सर्टिफिकट मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा रनटाइम 3 तासांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ओटीटी आवृत्तीच्या रनटाइमबद्दल खुलासा झाला आहे. ओटीटीवर या चित्रपटाचा रनिंग टाइम जास्त असू शकतो असं सांगण्यात येत आहे. ओटीटीवरील आवृत्तीचा रनटाइम 30 मिनिटे जास्त असेल. या चित्रपटाचा रुपेरी पडद्यावर रनटाइम 3 तास 21 मिनिटे आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, अनिल कपूर, तृप्ती दिमरी, शक्ती कपूर,परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला, बॉबी देओल आणि इतर कलाकार आहेत.
'अॅनिमल'चं अॅडव्हान्स बुकिंग : रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करेल असं सध्या दिसत आहे. रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे. या चित्रपटाचे शो झाले हाऊसफुल्ल झाले आहेत. रणबीरनं एक मुलाखती दरम्यान या चित्रपटाबाबत सांगितलं होतं की, 'हा चित्रपट लांबलचक आहे. या चित्रपटाची कहाणी समजायला वेळ लागेल'. हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर खूप हिंसक दिसत आहे.