महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor Animal : 'अ‍ॅनिमल'ला अमेरिकेत मिळाल्या 'इतक्या' स्क्रीन्स, 'जवान'लाही टाकले मागे - रश्मिका मंदान्ना

Ranbir Kapoor Animal : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला अमेरिकेत 800 हून अधिक स्क्रीन्स मिळाल्या आहेत. याबाबतीत रणबीर कपूरच्या या चित्रपटानं शाहरुख खानच्या 'जवान'ला मागे टाकलं आहे.

Ranbir Kapoor Animal
रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 4:00 PM IST

Updated : Nov 8, 2023, 4:15 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor Animal : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'अ‍ॅनिमल' हा लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी रणबीर चाहते उत्सुक आहेत. आता रणबीर कपूरच्या चित्रपटाबाबत अपडेट आली आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट अमेरिकेत 800 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान याबाबत रणबीर कपूरच्या चित्रपटानं शाहरुख खानच्या 'जवान'ला देखील मागे टाकला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करेल असा सध्या अंदाज बांधला जात आहे.

अमेरिकेत 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला मिळाल्या इतक्या स्क्रीन :मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाच्या 'अ‍ॅनिमल'ला अमेरिकेत 888 स्क्रीन्स मिळाल्या आहेत, जे या वर्षी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'जवान' चित्रपटापेक्षा जास्त आहेत. अमेरिकेत 'जवान' चित्रपट 850 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. याशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' 810 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त बॉबी देओल, अनिल कपूर, परिणीती चोप्रा, शक्ती कपूर, सौरभ शुक्ला, तृप्ती दिमरी, शरत सक्सेना आणि इतर कलाकारही दिसणार आहेत.

'अ‍ॅनिमल' कधी प्रदर्शित होईल :'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान बॉक्स ऑफिसवर विकी आणि रणबीरमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 100 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. या चित्रपटाकडून रणबीरला खूप अपेक्षा आहेत. रश्मिका आणि रणबीरच्या वर्क्रफंट बोलायचं झालं तर तो 'अंदाज अपना अपना 2', 'धूम 4' आणि 'रामायण'मध्ये दिसणार आहे. शेवटी तो 'तू झूठी मै मक्कार'मध्ये दिसला होता. दुसरीकडे रश्मिका मंदान्ना ही अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Elvish Yadav rave party case : रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादवचा जबाब नोंद, गारुड्यांसमोर होणार चौकशी
  2. Janhvi Kapoor and Shikhar Pahariya : जान्हवी कपूरला शिखर पहारियानं म्हटलं, 'मी पूर्णपणे तुझा आहे'
  3. Diwali party : चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या पार्टीत 'या' स्टार्सनं लावली हजेरी
Last Updated : Nov 8, 2023, 4:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details