मुंबई: दिग्दर्शक करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या फार चर्चेत आहे. या आगामी रोमँटिक चित्रपटाचे यापुर्वी एक गाणे प्रदर्शित झाले होते. दरम्यान आता या चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'झुमका गिरा रे बरेली के बाजार में' हे गाणे शेअर केले आहे. गाण्याला शेअर करत त्याने लिहले, सीझनमधील सर्वात मोठा (झुमका) ड्रॉप २८ जुलै रोजी सिनेमागृहात'. हे गाणे अरिजित सिंग आणि जोनिता गांधी यांनी गायलेले आहे. तसेच या गाण्याला अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. या गाण्यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट फार सुंदर डान्स केला आहे. 'झुमका गिरा रे बरेली के बाजार में' हा आयकॉनिक ट्रॅक प्रेक्षकाना फार आवडत आहे.
रणवीर सिंगची रणबीर कपूरसोबत तुलना : हा आयकॉनिक ट्रॅक प्रदर्शित झाल्यानंतर लगेच, चाहत्यांनी या गाण्याच्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरूवात केली, अनेक चाहत्यांनी लाल हार्ट आणि फायर इमोटिकॉन्स पोस्ट केले आहे. तर काही चाहत्यांना रणबीर कपूरच्या तू झुठी में मक्कर डान्स नंबर 'शो मी द ठुमका'चे कॉपी वाटले आहे. या गाण्यावर एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, रणबीर का ठुमका, आलिया का झुमका... समान भावना' समानता जाणवत' तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहले, रणबीर ठुमका आणि रणवीरचा झुमका डान्स (हसणाऱ्या इमोजीसह) अनेकांनी रणवीर सिंगच्या डान्स मूव्हची तुलना रणबीर कपूरच्या डान्सशी केली आहे.