मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह सोहळा अत्यंत खासगी पध्दतीने पार पडला. करण जोहर, अयान मुखर्जी, आकाश अंबानी आणि श्लोका यांसारख्या जवळच्या मित्रांसह कपूर आणि भट्ट कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुरुवारी वांद्रे येथील त्यांच्या वास्तू अपार्टमेंटमध्ये हा सोहळा रंगला. दोघेही पाच वर्षांच्या डेटिंगनंतर लग्नबंधनात अडकले. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी मुलगा रणबीर कपूरच्या लग्नानंतर दिवंगत पती ऋषी कपूर यांच्यासाठी मनापासून एक चिठ्ठी लिहिली आहे.
मुलाच्या लग्नाच्या एका दिवसानंतर नीतू कपूरने इंस्टाग्रामवर सांगितले की, तिचे दिवंगत पती, बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे स्वप्न खरे झाले आहे. "हे कपूर साब यांना समर्पित आहे, तुमची इच्छा पूर्ण झाली," असे कॅप्शन नीतू यांनी रणबीरसोबतच्या फोटोसह लिहिले.
ऋषी कपूर यांचे एप्रिल 2020 मध्ये कर्करोगाशी लढा देऊन निधन झाले. रणबीरला आलियासोबत लग्न करताना पाहणे ही त्याची एक इच्छा होती. अहवालानुसार, दिग्गज अभिनेत्याने डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्यासाठी भव्य लग्नाची योजना आखली होती, परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. एका वेबलॉइडशी बोलताना नीतू आधी म्हणाली होती की, ''ऋषींना रणबीरला त्याच्या लग्नाच्या दिवशी पन्ना आणि पेशावरी परंपरेतील एक पगडी घातलेला - घोडीवर चढलेला पाहायचा होता. ते याबद्दल पूर्णपणे भावूक होते. 'किसी दिन, मुझे हमारे बेटे को घोडी पे सवार देखना है' असे तो म्हणत राहायचे.'' नीतूने शेअर केलेला फोटो पाहता, रणबीरने त्याच्या दिवंगत वडिलांच्या इच्छेचे पालन केल्याचे दिसत आहे, कारण त्याने मोठ्या ब्रॉचसह पगडी सजवली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो धुमाकूळ घालू लागले आहेत. समारंभाच्या आतील काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात एक वरमाला समारंभाचा समावेश आहे आणि दुसर्यामध्ये ते तीन-स्तरीय लग्नाचा केक कापताना दिसत आहेत.
हेही वाचा -पाहा, रणबीर आणियाच्या लग्नातील वरमाला सोहळ्याचा धमाल व्हिडिओ