मुंबई - Rakhi Sawant Religion : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. आता राखी नुकतीच उमराहसाठी मक्का येथे गेली होती. त्यानंतर तिने मक्कामधून काही व्हिडिओ आणि फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. तसंच राखी सध्या तिचं नाव फातिमा असल्याचं सांगत आहे. त्यामुळे अनेक यूजर्स तिला ट्रोल देखील करत आहेत. दरम्यान आता एक राखीबाबत बातमी समोर येत आहे. शर्लिन चोप्रा, राजश्री मोरे आणि आदिल खान दुर्रानी यांनी तिच्याबाबत काही खुलासे केले आहेत. याशिवाय अर्शी खानने देखील आता राखी सावंतला खडसावले आहे.
अर्शी खानने केला राखीवर प्रहार :राखी सावंतचा दुसरा पती आदिल दुर्रानी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिच्यावर अनेक आरोप करत आहे. अर्शी खाननेही तिच्यावर धर्म बदलण्याचा आरोप केला आहे. तिला धडा शिकवला पाहिजे, असं म्हटलं आहे. एका मुलाखतीदरम्यान अर्शी खानने म्हटले की, राखी सावंत ख्रिश्चन होती आणि ती हिंदू होती, आता तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. पुढे तिने सांगितलं की, आदिल खान जे बोलत आहे ते बरोबर आहे. राखीवर रागावत अर्शीने म्हटलंय, की, ती जे करत आहे ते चुकीचं आहे. राखीच्या मैत्रिणीने तिच्यावर आरोप केले असतील तर ते प्रसिद्धीसाठी नसेल, असं तिने सांगितलं.