बंगळुरू ( कर्नाटक ) : बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत पती आदिलविरुद्धच्या खटल्यासंदर्भात आज म्हैसूर न्यायालयात पोहोचली आहे. म्हैसूर येथील न्यायालयासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नुकतेच निधन झालेल्या आईची आठवण करून अभिनेत्री राखी सावंत भावूक झाल्याची पहायला मिळाली. पती आदिल खान दुर्रानीवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर राखी सावंतला अश्रू अनावर झाले. माध्यमांसमोर तिने त्यांच्या भावनांना वाट करून दिली.
पोलीस कोठडी : राखी सावंत हिने अलीकडेच आदिल खान दुर्राणीविरुद्ध मुंबईत फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला यापूर्वीच अटक केली आहे. दरम्यान, म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलीस स्टेशनमध्ये एका इराणी विद्यार्थ्यीनीने पोलिसांकडे तक्रार केली की, आदिल खान दुर्राणीने लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली आहे. दरम्यान, मुंबईत अटक करण्यात आलेल्या आदिलला म्हैसूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदिलला आज म्हैसूर येथे आणून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आदिलला २७ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याला जामीन मिळू नये, मला न्याय हवा : यावेळी राखी सावंतही कोर्टात हजर होती. कोर्टाच्या सुनावणीनंतर राखी सावंतने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राखी म्हणाली, त्याने मला फसवले आहे. त्यांनी माझ्याशी कायद्यानुसार आणि मुस्लिम धर्मानुसार लग्न केले आणि माझ्याकडे असलेले १ कोटी ६५ लाख रुपये फसवून घेतले. त्याने माझ्यावर हल्ला करून मला मारण्याचा प्रयत्न केल्याचे राखी सावंतने सांगितले. माध्यमांशी बोलताना राखी सावंत खूपच भावूक दिसली आणि म्हणाली, आदिलला जामीन मिळू नये, मला न्याय हवा आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. मी हिंदू असल्यामुळे आदिलचे वडील मला स्वीकारत नाहीत. आदिल हा फसवणूक करणारा आहे, असा आरोप राखीने केला आहे.
आदिलकडून मारहाण, राखीचा खुलासा :आदिलच्या कुटुंबीयांविषयी बोलताना तिने सांगितले की, राखीने सासू-सासऱ्यांना संपर्क केला. तिने त्यांना सगळी हकीकत सांगितली. आदिल गेल्या सहा महिन्यांपासून फसवणूक करत असल्याचे तिने सासू-सासऱ्यांना सांगितले. आधीच माहित असते तर कधीच त्याला सोडून दिले असते. कदाचीत सूचना तरी दिल्या असत्या. त्याचा खूप गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, लग्नाआधीच मला माहित असते तर आजचा हा दिवस आला नसता, असेही राखी म्हणाली.
यह भी पढ़ें:Adil Khan Rape case: राखी सावंत के पति आदिल के खिलाफ मैसूर में रेप का मामला दर्ज