मुंबई - आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री 2 च्या निर्मात्यांनी बुधवारी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात त्यांच्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. या प्रसंगी अभिनेता राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. स्त्री 2 हॉरर कॉमेडी सिक्वलच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यासाठी एक स्किट तयार केले होते. 'स्त्री 2' हा चित्रपट 31 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री' 2018 साली प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे सिनेमा ब्लॉकबस्टर हिट झाला होता.
भेडिया चित्रपटाचाही सिक्वेल येणार- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या वरुण धवनच्या 'भेडिया' या हॉरर कॉमेडी चित्रपटात राजकुमार आणि अपारशक्ती यांचाही एक कॅमिओ होता. 'भेडिया'च्या निर्मात्यांनीही या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. यासाठी आयोजित सोहळ्यात वरुणने भेडिया 2 च्या लोगोचे लॉन्चिंग केले आणि त्याचा उत्साह व्यक्त करत लांडग्याचा आवाजही काढला. भेडिया हा चित्रपट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला. वरुण धवन एका वेगळ्या अवतारात या चित्रपटात दिसला होता.