महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rajkummar Rao And Patralekha : राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखाचा रोमँटिक व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ... - फराह खान

Rajkummar Rao And Patralekha : अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा पॉलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या पत्नीसोबत रोमँटिक क्षण घालवत आहे.

Rajkummar Rao And  Patralekha
राजकुमार राव आणि पत्रलेखा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 10:22 AM IST

मुंबई - Rajkummar Rao And Patralekha : अभिनेता राजकुमार राव हा चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयानं त्यानं अनेकांची मनं जिंकली आहेl. राजकुमारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तो खूप खासगी व्यक्ती आहे. त्यानं १५ नोव्हेंबर २०२१ रोजी गर्लफ्रेंड पत्रलेखा पॉलशी लग्न केलं. दरम्यान शुक्रवारी, हे जोडपं एका रोमँटिक क्षणाचा आनंद घेतानादिसलं, तर हुमा कुरेशी आणि साकिब सलीम यांनी त्यांच्या क्षणात व्यत्यय आणला. त्यांचा हा व्हिडिओ फराह खाननं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हाहायर होत असलेला व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे.

राजकुमार-पत्रलेखा यांचा रोमँटिक क्षण :सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राजकुमार राव पत्नी पत्रलेखाला घट्ट धरून आहे. हे जोडपं एकमेकांमध्ये हरवलंय. दोघेही त्यांच्या संभाषणात तल्लीन झाल्याचं दिसत असून एकमेकांना मिठी मारून आहेत. दरम्यान, भाऊ-बहीणची जोडी हुमा कुरेशी आणि साकिब सलीम हे दोघे मिळून राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या रोमँटिक क्षणांमध्ये व्यत्यय आणतात. हुमा आणि साकिबनं त्यांच्या फोनच्या कॅमेर्‍यानं या जोडप्याच्या अद्भुत क्षणाची रेकॉर्डिंग केली आहे. त्यानंतर हुमा आणि साकिब या जोडप्याजवळ गेलं, तेव्हा राजकुमार आणि पत्रलेखा आश्चर्यचकित झाल्याचं दिसतंय. राजकुमार, पत्रलेखा, हुमा कुरेशी, साकिब सलीम आणि फराह खानमध्ये चांगली मैत्री आहे. हे पाचही जण शुक्रवारी रात्री एकत्र दिसले.

राजकुमार राव वर्कफ्रंट : राजकुमार राव लवकरच जान्हवी कपूरसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव हा महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेत झळकेल. तर जान्हवी कपूर ही महिमा नावाच्या भूमिकेत असेल.'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाला अखेर रिलीज डेट मिळाली आहे. सोशल मीडियावर रिलीजच्या तारखेची घोषणा करताना, धर्मा प्रोडक्शनने लिहिलं, 'शरण शर्मा दिग्दर्शित आणि 'राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' 15 मार्च 2024 रोजी तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येत आहे!. हा चित्रपट करण जोहर, झी स्टुडिओज, हिरू यश जोहर आणि अपूर्व मेहता निर्मित आहे. याशिवाय राजकुमार हा लवकरच 'स्त्री 2' चित्रपटामध्येही दिसेल.

हेही वाचा :

  1. Rahul Chopra in role of Nitin Gadkari : 'गडकरी' चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा
  2. Sam Bahadur teaser: मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर टीझर'मध्ये विकी कौशलवर खिळल्या सर्वांचा नजरा
  3. Pooja Hedge currently unavailable : पूजा हेडगे 'सध्या उपलब्ध नाही', पाहा तिच्या निवांत क्षणांची एक झलक

ABOUT THE AUTHOR

...view details