महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Raj kundra UT 69 : दिल्लीच्या चांदणी चौकात राज कुंद्रानं केलं अनोख्या 'छंदा'चं प्रदर्शन - शिल्पा शेट्टी

Raj kundra UT 69 : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा त्याच्या 'यूटी 69' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो दिल्लीत चांदनी चौकात दही पापडी चाटचं वितरण करताना दिसत आहे.

Raj kundra UT 69
राज कुंद्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 5:15 PM IST

मुंबई -Raj kundra UT 69: बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा 'यूटी 69' या चित्रपटामुळं सध्या चर्चेत आहे. 'यूटी 69'मधून तो हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला फक्त 4 दिवस उरले आहेत. राज कुंद्रा आपल्या 'यूटी 69' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. हा चित्रपट राज कुंद्राने तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर आधारित आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानं दोन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात काढला. दरम्यान तो 'यूटी 69' चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं दिल्लीमध्ये चांदनी चौकात पोहोचला.

राज कुंद्रानं दही चाट पापडीचं केल वितरण :राज कुंद्रानं चांदनी चौकात काही लोकांना दही चाट पापडीचं वितरण केलं आहे. या व्हिडिओमध्ये खूप साध्या लूकमध्ये दिसत आहे. 30 ऑक्टोबर रोजी राज कुंद्रानं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चांदनी चौकात लोकांना दही चाट पापडी वाटताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यानं लिहलं, 'फूडपॉर्न हे एकमेव 'पॉर्न' आहे ज्याचा मी भाग होतो. राज कुंद्रा आपल्या पोस्टच्या कॅप्शनद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, त्यानं कधीही पॉर्न फिल्म्स बनवल्या नाहीत, त्याला फक्त स्वादिष्ट पदार्थ खाण्याचा छंद आहे आणि तो आपला छंद 'पॉर्न' मानतो.

राज कुंद्राच्या व्हिडिओवर आल्या प्रतिक्रिया :राज कुंद्राच्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. अनेकजण त्याचे सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. एका यूजरनं त्याला पोस्टवर कमेंट करत म्हटलं, 'तु खूप चांगला आहे. तुझा चित्रपट नक्कीच हिट होईल' दुसऱ्या एकानं लिहलं, 'खूप खास काम केलं तू दिल्लीवाल्याची मजा आहे' आणखी एकानं लिहलं,' हे प्रमोशन करण्याची चांगली आडिया आहे' याशिवाय काहीजणांनी त्याला ट्रोल देखील केलं आहे. राज कुंद्रानं शिल्पा शेट्टीला तुरुंगातून पाठवलेली पत्रेही चाहत्यांना दाखवली आहेत. 'यूटी 69' हा चित्रपट 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत राज कुंद्रा दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'च्या सेटवर बॉबी आणि सनीची धमाल, होणार अनेक रहस्यांचा उलगडा
  2. Singham 3 : 'सिंघम 3'मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक रिलीज; सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं कौतुक...
  3. Vijay Thalapathy : 'लिओ'च्या यशाचं होणार जंगी सेलेब्रिशन, बॉक्स ऑफिसवर केली 'इतकी' कमाई...

ABOUT THE AUTHOR

...view details