मुंबई - Priyanshu chatterjee : 'तुम बिन' चित्रपट फेम प्रियांशू चॅटर्जी सध्या चर्चेत आला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो खूप गंभीर दिसत असून त्याचा लूक हा वेगळा आहे. त्यानं खांद्यापर्यंत केस आणि लांब दाढी वाढवली आहे. याशिवाय त्यानं यावर चष्मा लावला आहे. प्रियांशूनं पोपटी रंगाचा एक कुर्ता घातला असून तो फोटोमध्ये एक पुस्तक वाचताना दिसत आहे. त्याचा हा लूक त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी आहे. त्यानं पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेकजण आता कमेंट करत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहलं, ''तूझा 'तुम बिन'मधील लूक हा प्रचंड सुंदर होता''. त्यानंतर दुसऱ्या एकानं लिहलं, ''तूझा कुठला चित्रपट येणार आहे का?'' त्यानंतर आणखी एकानं म्हटलं, ''तूझा हा लूक खूप वेगळा आहे. पण छान दिसत आहे''.
'तुम बिन' चित्रपट :2001 मध्ये प्रदर्शित झालेला सुपर डुपर हिट चित्रपट 'तुम बिन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. आजही हा चित्रपट सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. या चित्रपटात संदली सिन्हा, हिमांशू मलिक, राकेश बापट आणि प्रियांशू चॅटर्जी मुख्य भूमिकेत होते. चित्रपट प्रदर्शित होऊन 20 वर्षे उलटून गेली आहेत. या चित्रपटात प्रियांशू चॅटर्जीने 'शेखर मल्होत्रा'ची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले. हा चित्रपट 158 मिनिटांचा होता आणि 13 जुलै 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट 2 कोटीमध्ये बनवण्यात आला होता.